CBSE 10th Results Announced: सीबीएसई बोर्डाच्या दहावीचा निकाल जाहीर

CBSE Board X Results Announced लॉकडाऊन आणि कोरोनामुळे उर्वरित परीक्षा रद्द केल्यानंतर सीबीएसई बोर्डाने आज अखेर निकाल जाहीर केले आहेत.

एमपीसी न्यूज- सीबीएसई बोर्डाच्या दहावीचा निकाल आज (दि.15) जाहीर झाला आहे. लॉकडाऊन आणि कोरोनामुळे उर्वरित परीक्षा रद्द केल्यानंतर सीबीएसई बोर्डाने आज अखेर निकाल जाहीर केले आहेत. सीबीएसई बोर्डाचा दहावीचा 91.46 टक्के इतका निकाल लागला आहे.

यावर्षी दहावीसाठी 18 लाख 85 हजार 885 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. परंतु, परीक्षा 18 लाख 73 हजार 015 विद्यार्थ्यांनी दिली. त्यातील 17 लाख 13 हजार 121 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

विद्यार्थी आपले निकाल सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइट cbseresults.nic.in आणि results.nic.in वर जाऊन आपला निकाल पाहू शकतात.

केंद्रीय मनुष्यबळ निर्माण मंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी दहावीच्या निकालाबाबत काल ट्विटरवरून ही घोषणा केली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.