Pune : टाटा मोटर्समध्ये खंडेनवमीची पारंपारिक पूजा साजरी

एमपीसी न्यूज – टाटा मोटर्स लि. पुणे येथील पिंपरी-चिंचवड व चिखली येथील कारखान्यांमध्ये खंडेनवमीची पूजा उत्साहात साजरी करण्यात आली. व्यवस्थापनाच्या वतीने व टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियन यांनी या प्रसंगी कारखान्यातील सर्व कामगारांना, कर्मचा-यांना व त्यांच्या कुटुंबीयांना खंडेनवमीच्या व दस-याच्या शुभेच्छा दिल्या. कामगार, कर्मचारी व युनियनने यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे कौतुक करत येणा-या काळात असेच योगदान सर्वांकडून मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली.

दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील टाटा मोटर्स लि. च्या सर्व कर्मचा-यांनी आपपाल्या विभागात मोठ्या उत्साहाने मशीन्सची पूजा अत्यंत आकर्षक पुष्प सजावट करून केली. या प्रसंगी सर्व विभागातील अधिकारी व कामगारांनी उत्साहाने भाग घेतला. पिंपरी, चिंचवड व चिखली कारखान्यांमध्ये असेंब्ली लाईन्स, ईआरसी फौंड्री, ट्रेनिंग डिव्हिजन, इंजिन शॉप, पी.ई. महत्वाच्या ठिकाणी पूजा पारंपारिक पद्धतीने करण्यात आली.

याप्रसंगी मॅन्युफॅक्चरिंग हेड अजोय लाल, पीव्हीबीयुचे व्हाईस प्रेसिडेंट राजेश खत्री, एच आर व्हाईस प्रेसिडेंट सिताराम कंदी, सीव्हीबु प्लांट हेड अलोक सिंग, पीसीबीयु प्लांट हेड जयदीप देसाई, सीवीबीयु क्वॉलिटी व्हाईस प्रेसिडेंट अनिल सिन्हा, पीव्हीबीयु क्वॉलिटि वरिष्ठ व्यवस्थापक चेतन चावला, कॉर्पोरेट ईआर व्ही सुरेश, एच आर हेड सरफराज मणेर, ईआर हेड रवि कुलकर्णी, ईआर उपमहाव्यवस्थापक शरद सावंत, तसेच टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष भैय्या लांडगे, जनरल सेक्रेटरी संतोष दळवी, कार्याध्यक्ष अशोक माने, खजिनदार अबिदअली सय्यद, तसेच युनियनचे सर्व पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते. याप्रसंगी कंपनीमधील सर्व अधिकारी आणि कामगार बंधू उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.