Talegaon Dabhade : चैतन्य इंटरनॅशनल स्कूलमध्ये 72 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज : इंदोरी येथील चैतन्य इंटरनॅशनल स्कूलमध्ये 72 वा  प्रजासत्ताक दिन वृक्षारोपण व संवर्धनचा संकल्प करून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे विश्वस्त ह.भ.प शिवाजी मोरे महाराज हे उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष भगवान शेवकर सर, सचिव राधिका शेवकर , संचालक त्यागराज शेवकर  विद्यालयाच्या मुख्याध्यापिका हेमलता खेडकर,  शिक्षक वर्ग,  कर्मचारी वर्ग, पालक वर्ग आणि विद्यार्थी हे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहणाने  करण्यात आली. यावेळी नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांतर्फे उपस्थित मान्यवरांना संचलनद्वारे मानवंदना देण्यात आली.

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ह.भ.प शिवाजीर मोरे महाराज यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, वृक्ष हे संतांची रूपे आहेत۔ आपण पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे यानंतर संस्थेचे अध्यक्ष भगवान शेवकर सर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले۔आपल्या मनोगतातून त्यांनी सांगितले की आजच्या काळात शाळेमधून विद्यार्थ्यांना संताची शिकवण “आम्हा सोयरे वृक्षवल्ली वनचरे” याचे महत्व मुलांमध्ये बिंबवले पाहिजे तसेच ,मुलांमध्ये देशभक्तीची भावना रुजवण्यासाठी व त्यांना देश रक्षणाच्या कार्यास सिद्ध करण्यासाठी सैनिकी शिक्षण महत्वाचे आहे.

या उदेशाने पुढील वर्षापासून चैतन्य इंटरनॅशनल स्कूलमध्ये सैनिकी प्रशिक्षण सुरू करण्याचे आयोजले आहे व या कार्यात पालकांनी सहकार्य करावे तसेच पर्यावरण  आपल्यासाठी महत्त्वाचे असल्यामुळे 500 पिंपळाची झाडे  लावण्याचा संकल्प या शुभदिनी केला.

आभार हेमलाता खेडकर यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका, अध्यापक वर्ग व कर्मचारी वर्ग यांनी केले होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिव्या चॅटर्जी   यांनी केले. यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख प्रमुख पाहुणे, उपस्थित मान्यवर पालक वर्ग सर्व अध्यापक व विद्यार्थी यांच्या हस्ते  वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवण्यात आला. सर्वात शेवटी विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आला व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.