Pune News : धायरीत भरधाव डंपरखाली चिरडल्याने तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज : भरधाव वेगातील डंपरने दुचाकीला धडक दिल्याने खाली पडलेल्या दुचाकीवरील व्यक्तीचा डोक्यावरून डंपरची चाक गेल्यामुळे एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. धायरीतील आकाशदीप सोसायटी समोर सोमवारी सायंकाळी हा अपघात घडला. 

या अपघातात ज्योतीराम राजाभाऊ शिंदे (वय 24) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. डंपर चालक जयकरण बैजूलाल सहानी (वय 24) याच्या विरोधात सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अजित महादेव लोहाप (वय 27) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी फिर्यादी आणि ज्योतीराम शिंदे हे उंबऱ्या गणपती चौकातून धायरी फाट्याकडे दुचाकीने जात होते. यावेळी आकाशदीप सोसायटी समोरून जात असतांना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या डंपरने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यामुळे जोतीराम शिंदे हे दुचाकीवरून खाली पडले आणि त्याच डंपरचे चाक त्याच्या डोक्यावरून गेले यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक तनपुरे करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.