Chinchwad : संस्कार  प्रतिष्ठानची दिवाळी गडचिरोलीत साजरी 

एमपीसी न्यूज –  संस्कार प्रतिष्ठान व आदिवासी ठाकर मंडळ यांच्या संयुक्‍त विद्यमाने सलग तिस-या वर्षीची  दिवाळी गडचिरोली येथील अती संवेदनशिल व नक्षलग्रस्त भागात साजरी केली. व्हॉटस्‌ऍप व फेसबूकच्या माध्यमातून केलेल्या आवाहनाला शहरवासियांनी मोठ्‌या प्रमाणावर प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणावर दिवाळी भेट दिली.
भामरागड, जिमलगट्टा, आलापल्ली, पेरूपल्ली, हेमलकसा येथील आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली. व्हॉटस्‌ऍप व फेसबूकच्या माध्यमातून सात हजार साड्या, दोन हजार पुरूषांचे ड्रेस, एक हजार महिलांचे ड्रेस, दोन हजार लहान मुलांचे ड्रेस, गरोदर महिलांसाठी शंभर प्रोटीन्सचे डब्बे, लहान मुलांसाठी च्यवनप्राशचे शंभर डब्बे, पाचशे टुथपेष्ट, एक हजार आकाश कंदील, एक हजार बिस्किट पुडे, एक हजार पणत्या असे साहित्य घेऊन 28 ऑक्‍टोबर रोजी चिंचवड येथून संस्कार प्रतिष्ठानचे 27 सभासद गडचिरोलीकडे रवाना झाले होते.
दि. 31 ऑक्‍टोबरपासून भामरागड परिसरातील आदिवासी पाडे, वस्त्यांवर जाऊन घरांना आकाश कंदील लावत कपडे, मिठाईचे वाटप करण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागडच्या प्रांगणात सीआरपीएफ 37 बटालियनचे चिफ कमांडर मीना तसेच अहेरीचे अप्पर पोलीस अधीक्षक अजय बंसल, तहसिलदार कैलास अंडील गट शिक्षण अधिकारी सोनवणे यांच्या हस्ते सुमारे सात हजार आदिवासींना साहित्य व फराळाचे वाटप करण्यात आले. आदिवासी बांधवांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
हेमलकसा लोकबिरादरी प्रकल्पाला 250 किलो साखर आणि औषधे व दोनशे साड्या मदत म्हणून ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे व मंदा आमटे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे, संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मोहन गायकवाड, रूपाली नामदे, प्राजक्‍ता रूद्रवार, सोमनाथ कोरे, प्रशांत मळेकर, सायली सुर्वे, रमेश सरदेसाई, शिवकुमार बायस, आनंद पुजारी, प्रिया पुजारी, रमेश भिसे, प्रिती जमादार, अभिजित लोंढे, माधव मोहिते, सोमराज चव्हाण, संकेत आगम, विजय आगम, अशोक म्हेत्रे, शुभांगी अनपट, सतीश मापारी, स्मिता पवार, कल्पना मुरूमकर, भागिरथी तलवार, उमा तलवार, पौर्णिमा नाटेकर, हरिष कावरे, रमाकांत गवारे यांनी संयोजन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.