Indrayani River : इंद्रायणी माता प्रदूषण मुक्तीसाठीचे साखळी उपोषण तिसऱ्या दिवशी सुरूच

एमपीसी न्यूज : आळंदी येथील महाद्वार चौकातील इंद्रायणी माता (Indrayani River)प्रदूषण मुक्तीसाठी साखळी उपोषणाचा आज (दि.3 मे) तिसरा दिवस असून सकाळी 7 वाजता पुरुषोत्तम महाराज हिंगणकर यांनी या तिसऱ्या दिवशीच्या उपोषणास सुरवात केली.

रिपब्लिकन युवा सेना राजकिय पक्ष यांच्या तर्फे लहू आमराळे यांनी या उपोषणास पाठींबा दिला. यावेळी रवी तापकीर, अनिता बागडे, नवशान पठाण, आशा पठाण, दिव्या भुजबळ इतर मान्यवर उपस्थित होते.

महिला संघटनाच्या वतीने गौरी गोळे, उज्वला चौधरी मान्यवरांनी या उपोषणास पाठिंबा दिला. वारकरी संप्रदायाच्या वतीने नरहरी महाराज चौधरी यांनी या उपोषणास पाठींबा देत ते म्हणाले इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त होण्यासाठी प्राणाचा ही त्याग करू.

Pimpri : माझी वसुंधरा स्पर्धेत पीसीसीओईचा प्रथम क्रमांक

तसेच त्यांनी इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त होण्यासाठी केलेल्या कार्याची (Indrayani River)येथे माहिती दिली. श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती यांनी या उपोषणास पाठींबा दिला.

समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे यांनी इंद्रायणी नदीची महती सांगत व संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या भक्ती शक्तीचा मिलाप म्हणजे इंद्रायणी काठ याबाबत मनोगत व्यक्त करत असताना इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्तीबाबत उपाययोजना याबाबत माहिती दिली.

यावेळी सुरेश वडगांवकर, ज्ञानेश्वर जाधव, श्रीधर नाईक, संकेत वाघमारे व इतर मान्यवर उपस्थित होते.

सकाळी ग्रामस्थ बाबूलाल घुंडरे, कुंडलिक कुऱ्हाडे, श्रीधर कुऱ्हाडे, बापूसाहेब कुऱ्हाडे इ.मान्यवरांनी या उपोषणास पाठींबा दिला. या उपोषणास पाठींबा म्हणून नोंदवही स्वाक्षरी मोहिमेत एक हजार नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांचा टप्पा तिसऱ्या दिवशी पार झाला आहे.

बाजार समितीच्या क्रांती सोमवंशी यांनी या उपोषणास सदिच्छा भेट देत पाठींबा दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.