Chakan : बसची कारला धडक; कारचे नुकसान

Bus hits car; Car damage

एमपीसी न्यूज – चालक बस मागे घेत असताना बसची एका कारला धडक बसली. यामध्ये कारचे नुकसान झाले. या घटनेनंतर आरोपी बसचालक घटनास्थळी न थांबता पळून गेला. ही घटना 29 जून रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास चाकणजवळील मेदनकरवाडी येथे घडली.

रविंद्रसिंग महिंद्रसिंग बारेठ (वय 32, रा. पिंपळे गुरव) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बस चालक कल्पेश सोमनाथ सोनवणे (रा. बालाजीनगर, मेदनकरवाडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कल्पेश सोमवारी दुपारी साडेपाचच्या सुमारास बस (एमएच 14 / सीडब्ल्यू 3666) पाठीमागे घेत होता. त्यावेळी बसच्या मागे फिर्यादी यांची कार (एमएच 14 / जेए 0850) उभी होती.

आरोपीने फिर्यादी यांच्या कारला धडक दिली. यामध्ये कारचे नुकसान झाले. यानंतर आरोपी कल्पेश घटनेची माहिती न देता घटनास्थळावरून पळून गेला.

चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.