Chakan : धावत्या ट्रकमधील मालास आग; तत्परतेने टळली दुर्घटना

एमपीसी न्यूज : पुणे नाशिक महामार्गावरील चाकण (Chakan) येथील तळेगाव चौकात एका बंद बॉडी ट्रकमधील साहित्याला आग लागल्याची घटना गुरुवारी (दि. 22) दुपारी एकच्या सुमारास घडली. वाहतूक पोलिसांच्या तपासणी दरम्यान सदरचा प्रकार उघडकीस आला. तातडीने वाहतूक पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने ट्रकमधील मालाला लागलेली आग विझवली; त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.

चाकण येथील तळेगाव चौक या ठिकाणी वाहतूक पोलीस कारवाई करत असताना बंद बॉडी ट्रक (क्र. एमएच 46 ए आर 8987) तळेगावकडून शिक्रापूरकडे जात होता. संबंधित ट्रकच्या मागील बाजूने धूर निघताना दिसला. वाहतूक पोलिसांनी वाहन चालकास ट्रक थांबवण्यास सांगितले. ट्रकमध्ये काय सामान आहे? याची विचारपूस केली केली. गाडीत गॅसचे सिलेंडर, पँकिंग प्लास्टिक मटेरियल, बॅटरी व घरगुती सामान असल्याचे चालकाने सांगितले.

 

Chakan News : गॅस सिलेंडरच्या स्फोटात रुग्णालयात उपचार घेत असलेल्या दोघांचा मृत्यू

पोलिसांनी चालकास खाली उतरून ट्रकचा पाठीमागील (Chakan) भाग उघडण्यास सांगितला. तेव्हा प्लास्टिकचे 4 ते 5 मोठे बंडल पेटलेले असल्याचे लक्षात आले. वाहतूक पोलीस आणि नागरिकांनी ट्रकमधील मालास लागलेली आग विझवली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. पोलीस आणि नागरिकांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.