Chakan Crime News : बांधकाम साईटवरून सव्वा लाखांचे साहित्य लंपास

एमपीसी न्यूज – बांधकाम साईटवरून अज्ञात चोरट्यांनी एक लाख 18 हजारांचे बांधकामाचे साहित्य चोरून नेले. ही घटना सोमवारी (दि. 29) दुपारी चाकण जवळ वाहगाव येथे उघडकीस आली.

कविता मनोज सेठिया (वय 50, रा. चिंचवड) यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सेठिया यांचे वाहगाव येथे बांधकाम सुरु आहे. 26 मार्च ते 29 मार्च या कालावधीत चोरट्यांनी बांधकाम साईटवरून एक लाख 18 हजार 876 रुपये किमतीचे सिमेंटची पोती, लोखंडी सळया, बांधकामाचे साहित्य चोरून नेले.

चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.