Chakan : प्रेमात मिळालेला धोका आणि सावकाराच्या तगाद्याला कंटाळून तरुणाची आत्महत्या

एमपीसी न्यूज – प्रेमाचे नाटक करून वेळोवेळी पैसे लुबाडून धोका दिला. तसेच उसने घेतलेल्या पैशांसाठी एकाने वारंवार तगादा लावला. याला कंटाळून एका तरुणाने आत्महत्या केली. ही घटना खेड तालुक्यातील रोहकल येथे घडली आहे.

प्रकाश पोपट पवार (वय 30) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी या तरुणाच्या आईने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पूजा दशरथ पवार, तारा दशरथ पवार (दोघी रा. चाकण), सनी वडाने (रा. खेड), गणेश बळीराम शिंदे (रा. मोशी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मयत मुलगा प्रकाशसोबत आरोपी पूजा हिने प्रेमाचे नाटक केले. त्यांना फसवून त्यांच्याकडून वेळोवेळी पैसे लुबाडले आणि विश्वासघात केला. यासाठी आरोपी तारा आणि सनी या दोघांनी पुजाला साथ दिली.

दरम्यान, प्रकाश यांनी आरोपी गणेशकडून उसने पैसे घेतले होते. त्या पैशांची वारंवार मागणी करून गणेश याने प्रकाश यांना मानसिक त्रास दिला. वरील दोन्ही कारणांमुळे प्रकाश यांनी 16 मे रोजी मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास आत्महत्या केली.

चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.