chakan : भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हाध्यक्षपदी लक्ष्मण दुधवडे यांची निवड

एमपीसी न्यूज -पुणे जिल्हा भारतीय बौद्ध महासभेच्या अध्यक्षपदी लक्ष्मण दुधवडे (गुरुजी) यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पुण्यातील नालंदा विहारात रविवारी (दि.२७) राष्ट्रीय महासचिव जगदीश गवई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली आहे.

यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यु.जी. बोराडे, भिकाजी कांबळे, एस. के. भंडारे यांच्यासह पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.

दरम्यान, दुधवडे मागील दहा वर्षे भारतीय बौद्ध महासभेचे खेड तालुका अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या तालुक्यातील कामाची दखल घेत जिल्हाध्यक्ष पदावर सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

  • भारतीय बौद्ध महासभेची पुणे जिल्हा कार्यकारणी पुढीलप्रमाणे :
    अध्यक्ष -लक्ष्मण दुधवडे, सरचिटणीस -राधाकांत कांबळे, कोषाध्यक्ष- भीमराव ढोबळे, हिशोब तपासणीस- अशोक कडलग, उपाध्यक्ष – दतात्रेय गायकवाड, पांडुरंग ढोबळे, प्रकाश ओव्हाळ, अंजना कांबळे, सचिव – भास्कर जावळे, दालीतानंद थोरात, सुमेध भोसले, विनोद कांबळे, संगीता भंडारे, राजेंद्र भोसले, संघटक : पी.के. पवार, विलास रणपिसे, श्रीकांत गायकवाड, गौतम ओव्हाळ.

महासभेचे काम जिल्ह्यात सर्वत्र पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नूतन जिल्हाध्यक्ष लक्ष्मण दुधवडे यांनी निवडीनंतर बोलताना सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.