Chakan : लक्ष्मीबाई माळवे यांचे निधन

एमपीसी न्यूज- पुणे कॅम्प येथील मोदीखाना भागातील जुन्या पिढीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मीबाई सीताराम माळवे (वय 78 ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते विजय माळवे यांच्या त्या आई, भारतीय बौद्ध महासभेचे पुणे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण दुधवडे व भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय डोळस यांच्या त्या सासू व पत्रकार अविनाश दुधवडे यांच्या त्या आजी होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.