Chakan News : दिवंगत आमदार गोरे कुटुंबीयांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश

खेड तालुक्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला प्रवेश

एमपीसी न्यूज – चाकण येथील खेड मतदारसंघाचे दिवंगत आमदार सुरेश गोरे (Chakan News) यांची पत्नी मनीषाताई गोरे, त्यांचे बंधू नितीन गोरे यांच्यासह गोरे कुटुंबातील इतर सदस्य तसेच पुणे ग्रामीण पट्ट्यातील स्थानिक स्तरावरील अनेक जिल्हापरिषद व पंचायत समिती सदस्य अनेक पदाधिकाऱ्यांनी काल (दि.14) शिवसेना(शिंदे गट) पक्षात जाहीर प्रवेश केला.

 

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली या पदाधिकाऱ्यांनी भगवा झेंडा हातात घेत पक्षप्रवेश केला. या सर्वांचे शिवसेना पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामजिक आणि राजकीय वाटचालीसाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.
राज्यातील महायुती सरकार हे सर्वसामान्य नागरिकांना न्याय देणारे सरकार असून आपल्या भागातील प्रलंबित प्रश्न देखील सरकारच्या माध्यमातून नक्की सोडवण्यात येतील असे यासमयी बोलताना  मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले. तसेच शिरूर नगरपरिषदेच्या इमारतीचा प्रश्न देखील नक्की सोडवू असेही यावेळी बोलताना आश्वस्त केले.

 

 

यावेळी खेड तालुक्यातील असंख्य पदाधिकारी कार्यकर्त यांनी शिवसेनेत (Chakan News) प्रवेश केला. त्यामध्ये स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या पत्नी मनिषाताई गोरे,स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांचे बंधु युवा नेते नितीनशेठ गोरे व त्यांचे सर्व कुटुंबातील सदस्य,समर्थ फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष विजयसिंह शिंदे,जिल्हा परिषद सदस्य रुपालीताई कड,मा.सभापती काळुरामशेठ कड,राजगुरुनगर बॅंकेचे विद्यमान उपाध्यक्ष दत्ताशेठ भेगडे,स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे मंडळाचे अध्यक्ष बिपीनशेठ रासकर,पंचायत समिती सदस्य मच्छिंद्र गावडे,जेष्ठ नेते मा.सरपंच मारुतीशेठ सातकर, चाकण नगरपरिषदेच्या मा.नगराध्यक्ष मंगलताई गोरे,मा.नगराध्यक्ष स्नेहलता जगताप,मा.उपनगराध्यक्ष राजुशेठ गोरे,
मा.उपनगराध्यक्ष प्रकाश गोरे,मा.नगरसेवक शहरप्रमुख महेशराव शेवकरी, मा.नगरसेवक प्रवीण गोरे,

 

Baramati News : गाईचा गोठा साफ करणे पडले महागात; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

 

मा.नगरसेवक निलेशभाऊ गोरे,मा.नगरसेवक राहुलशेठ कांडगे,कुरुळी गावचे चेअरमन नितीनशेठ गायकवाड,खालंब्रे गावचे चेअरमन अंकुशराव पवार,निमगावचे मा.आदर्श सरपंच अमरभाऊ शिंदे,मा.सरपंच संतोषशेठ शिंदे,निमगाव मा.सरपंच बि टी शिंदे,निमगाव सरपंच रावसाहेब भालेकर,गोरक्षनाथ कांडगे मा.चेअरमन चाकण, प्रकाशशेठ भुजबळ मा.चेअरमन चाकण,राहुलशेठ परदेशी चेअरमन चाकण नागरी पतसंस्था,दिपक थिगळे,तंटामुक्ती अध्यक्ष सातकरस्थळ,तेजस्विनी बागडे मा.सरपंच कुरूळी,सुभाष गाढवे मा.उपसरपंच भांबुरवाडी,
रघुनाथ आरुडे मा.सरपंच सांडभोरवाडी,शिवाजी आरूडे संचालक सोसायटी तिन्हेवाडी,सुधीर वाघ मा.अध्यक्ष रोटरी क्लब चाकण,युवा नेते सुजित टोपे,रुपेशआप्पा घारे,युवा नेते महेश शिंदे,नवनाथ तांबे,रोनक गोरे,सागरशेठ गोरे,निलेश टिळेकर,अमित शेवकरी,योगेश आगरकर या सर्वांनी शिवसेनेत प्रवेश केला.

 

 

 त्यावेळेस उपस्थितीत जुन्नर तालुक्याचे लोकप्रिय मा.आमदार शिवसेना जिल्हाप्रमुख शरद सोनवणे,शिवसेना जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर,शिवसेना जिल्हा संघटक अशोकराव भुजबळ,निलेशभाऊ पवार,शिवसेना तालुका प्रमुख राजुशेठ जवळेकर,युवासेना जिल्हाप्रमुख धनंजय पठारे,युवासेना जिल्हाप्रमुख बाप्पुसाहेब शिंदे,युवासेना तालुकाप्रमुख विशालआप्पा पोतले,शिवसेना नेते प्रकाश वाडेकर,आंबेगाव तालुका प्रमुख अरुणभाऊ गिरे,शिरुर तालुका प्रमुख रामभाऊ सासवडे,हवेली तालुका प्रमुख  विपुल शितोळे,आघाडी तालुका संघटीका ज्योतीताई आरगडे,शिवसेना उपतालुका प्रमुख संदिपशेठ येळवंडे,शिवसेना विभागप्रमुख राहुलशेठ थोरवे,युवासेना उपतालुका प्रमुख योगेशभाऊ पगडे,मा.सरपंच केशवराव आरगडे,

 

युवासेना शाखाप्रमुख शुभम पठारे,युवासेना शाखाप्रमुख मंगेशशेठ पोतले,युवा नेते प्रशांत दौंडकर,शिवसेना उपतालुका प्रमुख काळुरामशेठ खैरे,शिवसेना उपतालुका प्रमुख अंबर सांवत,शिवसेना विभागप्रमुख गोरख टेमगिरे,युवासेना उपतालुका प्रमुख सचिनभाऊ चोधरी,युवासेना उपतालुका प्रमुख संदिपशेठ काचोळे,शिवसेना उपविभाग प्रमुख समाधान पानसरे,युवासेना उपविभाग प्रमुख प्रशांत गोपाळे,वडगाव घेनंद गावचे शाखाप्रमुख ऋषिकेश घेनंद, किरणशेठ वाडेकर,संदिपशेठ मोरे आदी (Chakan News) उपस्थित होते.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.