Chakan News : बेकायदा गॅस रिफिलींग प्रकरणी एकाला अटक, 12,823 रूपयांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – बेकायदा गॅस रिफिलींग प्रकरणी एकाला अटक केली आहे. त्याच्याजवळून 12,823 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चाकण तळेगाव रोडलगत खराबवाडी, चाकण येथील जय गणेश रिपेअरिंग सेंटर या दुकानात सामाजिक सुरक्षा पथकाने 31 मार्च 2022 रोजी ही कारवाई केली.

मुनसिंग रामसिंग भिलाला (वय 29, रा. खराबवाडी, चाकण) असे अटक आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडे कोणत्याही प्रकारच्या शासकिय परवाना असताना अवैध पद्धतीने गॅस रिफिलींग करताना आढळून आला. आरोपी घरगुती वापराच्या सिलेंडर टाकीमधून रिकाम्या छोट्या सिलेंडर टाकीत गॅस रिफिलींग करत होता. सामाजिक सुरक्षा पथकाने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. चाकण पोलीस (म्हाळुंगे चौकी) अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.