_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Chakan : रॉयल इनफिल्ड बुलेट जाळून परिसरात दहशत; पाच जणांवर गुन्हा

Panic in the area by burning Royal Infield bullets; Crime on five people

एमपीसी न्यूज – रॉयल इनफिल्ड बुलेट जाळून तसेच हत्यारे घेऊन टोळक्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केले. याबाबत पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. 24) चाकण मधील जुन्या बाजारपेठेत घडली.

ओंकार मनोज बिसणारे, निखिल उर्फ दाद्या रतन कांबळे, नामदेव प्रकाश नाईक, विवेक कु-हाडे, आनंद शेट्टी (सर्व रा. चाकण) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. राणी महेश जगनाडे (वय 40, रा. जुनी बाजारपेठ, चाकण) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून बेकायदा जमाव जमवला. कोयते, हॉकी स्टिक, लाकडी दांडके अशी हत्यारे घेऊन परिसरात दहशत निर्माण केली.

त्यानंतर फिर्यादी यांना शिवीगाळ करून त्यांच्या मालकीची रॉयल इनफिल्ड बुलेट (एमएच 14 / एफए 4458) वर पेट्रोल टाकून जाळून टाकली. यात बुलेट जळून खाक झाली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.