Chakan : आषाढी एकादशी व बकरी ईदसाठी पोलिस प्रशासन सज्ज ; चाकण मध्ये पथसंचलन व मॉकड्रिल

एमपीसी न्यूज -आषाढी एकादशी व बकरी ईदच्या (Chakan) पार्श्वभूमीवर चाकण शहरात पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. दोन्ही सन एकत्रित साजरे होत असल्याचे पार्श्वभूमीवर चाकण मध्ये पोलिसांनी पथसंचालन व मॉकड्रिल केले. सोमवारी (दि. 26 ) सायंकाळी शहरातील विविध भागात पथ संचलन केल्यानंतर मंगळवारी (दि. 27 ) सकाळी चाकण मार्केट समोरील भागात मॉकड्रिल करण्यात आले.

आषाढी एकादशी व बकरी ईद हे दोन्ही सण गुरुवारी 29 जून या एकाच दिवशी येत आहेत. या पार्श्वभुमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी या दृष्टीकोनातून चाकणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांच्या नेतृवाखाली शहरात पोलीस पथ संचलन करण्यात आले आहे.

Maharashtra News : नवीन वस्त्रोद्योग धोरणाबाबत वस्त्रोद्योग घटकांच्या मागण्यांना मंत्र्यांकडून तत्वत: मान्यता

 

चाकण पोलीस स्टेशन , सुभाष चौक,जामा मस्जिद,बलुत आळी, गोल्डन चौक,खंडोबा माळ , महात्मा फुले नगर, नेहरू चौक, महात्मा फुले चौक, नगरपरिषद चौक, चाकण बाजारपेठ,माणीक चौक, असे मिश्र लोकवस्तीच्या भागात पथसंचलन करण्यात आले. यावेळी 1 पोलीस निरीक्षक, 5  सहा.पो. निरीक्षक, 37 पोलीस, अंमलदार तसेच आरसीपीचे19 पोलीस आमंलदार उपस्थित होते.

समाजकंटकांनी उपद्रव केल्यास पोलिस प्रशासन‎ अशा स्ठितीचा सामना‎ करण्यासाठी सज्ज आहे,  हे दाखवून देण्यासाठी‎ चाकण मार्केट समोरील भागात पोलिसांकडून मॉकड्रिल करण्यात‎ आले. अचानक करण्यात‎ आलेल्या या मॉकड्रीलमुळे काही‎ काळ नागरिकांमध्ये भितीचे वातावरण‎ पसरले होते;  नंतर मात्र‎ ही फक्त पोलिसांची मॉकड्रिल‎ असल्याचे समजल्यानंतर चाकणकरांनी‎ सुटकेचा श्वास सोडला.

 

या‎ मॉकड्रिलमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांच्यासह चाकण पोलिसांच्या सुमारे 25 पोलिसांच्या‎ पथकाने व आरसीपीच्या  19 जवानांनी सहभाग (Chakan) नोंदवला .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.