Pandharpur : विठ्ठलाची नगरी होणार स्वच्छ…मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार बीव्हीजी कंपनीचा पुढाकार

एमपीसी न्यूज – पंढरीच्या वारीमध्ये प्रथमच संबंध परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी (Pandharpur ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत  यांनी सर्व शासकीय यंत्रणा कामाला लावली असून लाखो भाविकांना, वारकरी मंडळींना स्वच्छ, सुंदर व निरोगी वारी करण्यासाठी वेळ प्रसंगी स्वच्छता क्षेत्रात भारतामध्ये सर्वात मोठी कंपनी असणाऱ्या बीव्हीजी कंपनीला पाचारण करण्यात आलेले आहे. त्यामुळे लाखो वारकरी बांधवांमध्ये आनंदमयी वातावरण तयार झाले असून मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त होत आहे.

दोन दिवसांपूर्वी मा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक पंढरपूर येथे भेट देऊन कायदा आणि सुव्यवस्था त्याच बरोबर रस्ते, पाणी, गटारे आणि सर्वात महत्वाचा विभाग म्हणजे स्वच्छता याबाबत प्रशासनाकडे चौकशी केली असता, स्वच्छता विभागामध्ये सरकार कोणत्याही प्रकारे कमी पडता कामा नये असे आदेश सोलापूर जिल्हाधिकारी श्री मिलिंद शंभरकर यांना दिले आहेत.

Chakan : आषाढी एकादशी व बकरी ईदसाठी पोलिस प्रशासन सज्ज ; चाकण मध्ये पथसंचलन व मॉकड्रिल

शासनाकडे स्वच्छता करण्यासाठी मनुष्यबळ कमी पडू नये यासाठी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतातील स्वच्छता विभागात सर्वात मोठी कंपनी असणाऱ्या बीव्हीजी कंपनीचे चेअरमन हणमंतराव गायकवाड यांना संपर्क साधून संपूर्ण पंढरी स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी सूचना केली.

या संदर्भात बीव्हीजी कंपनीचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड त्यांनी तात्काळ पुढाकार घेऊन, कोणताही मोबदला न घेता, लाखो वारकरी भक्तांची सेवा आणि मुख्यमंत्रीचा आदेश शिरसावंद्य मानून केवळ8  तासात सुमारे 600  स्वच्छता दूत पंढरपूरकडे रवाना केले.

याबद्दल जिल्हाधिकारी श्री मिलिंद शंभरकर, आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाधान व्यक्त केले आहे.

यासंदर्भात हणमंतराव गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांचा आदेश, आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत  यांनी केलेले आवाहन शिरसावंद्य मानून केवळ 8 तासात संपूर्ण स्वच्छता यंत्रणा उभी केली असून, शासनाकडून मिळणारा मोबदला 60-70 लाख रुपयाचा विचार न करता, सर्व वारकऱ्यांची मोफत सेवा करण्याचे आपण ठरविले असल्याचे (Pandharpur ) सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.