Chakan News : अन तक्रारदारांची चाकण पोलीस स्टेशन समोरच जुंपली

एमपीसी न्यूज चाकण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले, तक्रार दिली, थोड्यावेळाने पुन्हा पोलीस ठाण्यासमोर जमा झाले व त्यांनी आपापसातच (Chakan News) भांडण्यास सुरुवात केली. हा प्रकार गुरुवारी (दि.15) दुपारी घडला, याप्रकरणी पोलिसांनी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

साहिल महेश नाईरे (वय 23 रा. वराळे), अक्षय पन्नालाल चोरडिया (वय 28 रा.खेड), आकाश अशोक इंगळे (वय 25रा, शिरोली), आकाश पन्नालाल चोरडिया (वय 22), प्रणव हनुमंत खंडागळे (वय 20, चाकण), आशिष अशोकराव इंगळे (वय 28 रा.शिरोली),प्रतिक हनुमंत खंडागळे (वय 22), शंकर महेश नाईकनवरे (वय 26),पवन महिंद्र हलगे (वय 21 रा. चाकण) यांच्यावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Wakad News : मेन्टेनन्सच्या रकमेतील साडे 16 लाख रुपयांचा अपहार करणाऱ्या सोसायटी पदाधिकाऱ्यांवर गुन्हा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश चोरडिया याने पोलीस ठाण्यात तक्रार दिली व त्यानंतर तो पोलीस ठाण्याच्या गेटवर थांबला. (Chakan News) यावेळी दुपारी दोनच्या सुमारास इतर आरोपी देखील आले व त्यांनी मोठमोठ्या आरडा-ओरड करत एकमेकांना धक्काबुक्की करत भांडण्यास सुरुवात केली. यावरुन चाकण पोलिसांनी नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. चाकण पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.