Wakad News : मेन्टेनन्सच्या रकमेतील साडे 16 लाख रुपयांचा अपहार करणाऱ्या सोसायटी पदाधिकाऱ्यांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी सभासदांचा विश्वास संपादन करून 16 लाख 59 हजार 480 रुपयांचा अपहार करत सभासदांची फसवणूक केली. (Wakad News) हा प्रकार 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2020 या कालावधीत ओमेगा पॅराडाईज, वाकड येथे घडली.

राजेंद्र सीताराम कांबळे (वय 52, रा. पाषाण, पुणे) यांनी याप्रकरणी गुरुवारी (दि. 15) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अध्यक्ष सुमित भाटिया, राजेश रमन, सचिव नईम इकबाल मिर्झा, व्यवस्थापक सुरेश यादव,  व्यवस्थापक गोविंद चितळकर, लेखापाल विजय खटके, प्राधिकृत अधिकारी जितेंद्र विटकर, मॅनेजर आणि चैतन्य वॉटर सप्लायर्सच्या संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chakan : चाकण येथून अडीच लाखांचा गुटखा जप्त

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून ओमेगा पॅराडाईज फेज एक सहकारी गृहरचना संस्था मर्यादित या संस्थेच्या सभासदांचा विश्वास संपादन केला.(Wakad News) सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांकडे सोसायटीच्या कामासाठी दिलेल्या मेन्टेनन्सच्या रकमेतून 16 लाख 59 हजार 480 रुपयांचे व्हाउचर, चलन व बिलाद्वारे गैरव्यवहार केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.