Chakan News: राज्याच्या शैक्षणिक कार्य गटात प्राथमिक शिक्षक सचिन ढोबळे यांची निवड

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्यात शैक्षणिक कार्य गट (Academic Task Force) तयार करण्यात आला आहे. हा कार्यगट राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. या कार्यगटामध्ये प्राथमिक शिक्षक सचिन ढोबळे यांची निवड झाली आहे. या कार्यगटाची दिल्ली येथे कार्यशाळा होणार आहे. निपुण भारत योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील विविध शालेय योजनांच्या अंमलबजावणीचे हा कार्यगट नियंत्रण करणार आहे. यात निवड झालेले सचिन ढोबळे हे एकमेव प्राथमिक शिक्षक आहेत.

नवीन शैक्षणिक धोरण 2020 च्या अंमलबजावणीसाठी निपुण भारत ही राष्ट्रीय योजना मुलांच्या मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्य वाढविण्यासाठी  राष्ट्रीय स्तरावरुन सुरु करण्यात आली आहे.  महाराष्ट्र राज्यात त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्याचा  शैक्षणिक कार्य गट(Academic Task Force) सचिव शालेय शिक्षण विभाग व संचालक मराशैसंप्रप ,पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली कमलादेवी आवटे, उपसंचालक मराशैसंप्रप, पुणे यांच्या नेतृत्वात स्थापन करण्यात आला आहे. डॉ.कलिमोद्दीन शेख, प्राचार्य, जिशिवप्रसं,औरंगाबाद,डॉ.राजेश बनकर, उपविभागप्रमुख भाषा विभाग मराशैसंप्रप, पुणे,  रविंद्र खंदारे , उपशिक्षणाधिकारी, जि.प सातारा, गार्गी चतुर्वेदी, मुख्याध्यापक, मनपा शाळा उल्हासनगर व सचिन ढोबळे उपशिक्षक, जि.प.शाळा बच्चेवाडी,ता-खेड, पुणे. यांची निवड झाली आहे.

या कार्यगटात महाराष्ट्रातून निवड झालेले सचिन ढोबळे हे एकमेव प्राथमिक शिक्षक आहेत, मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान याविषयी केलेल्या अभ्यास व कामामुळे त्यांची या कार्यगटात निवड करण्यात आली आहे.

या कार्यगटाची दिल्ली येथे कार्यशाळा होणार असून निपुण भारत योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील विविध शालेय योजनांच्या अंमलबजावणीचे हा कार्यगट नियंत्रण करणार आहे तसेच  राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व हा कार्यगट करणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.