Chakan : चाकणच्या वाहतूक कोंडीबाबत विभागीय आयुक्तांनी घातले लक्ष

एमपीसी न्यूज – चाकण परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आता विभागीय (Chakan) आयुक्तांनी लक्ष घातले आहे. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी बैठक घेऊन वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींची माहिती घेण्याच्या प्रशासनाला सूचना केल्या.

त्यानंतर पिंपरी चिंचवड वाहतूक पोलीस, राष्ट्रीय महामार्ग, चाकण नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण, फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज, विविध कंपन्यांचे प्रतिनिधी यांनी स्पायसर चौक ते आंबेठाण चौक या दरम्यानची पाहणी केली. चाकणमधील तळेगाव चौक व आंबेठाण चौकात सर्वाधिक वाहतूक कोंडी होते, असे यावेळी निदर्शनास आले.

यावेळी पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त बापू बांगर, राष्ट्रीय महामार्गाचे प्रतिनिधी तोडकर, चाकण नगरपालिकेचे सीईओ बल्लाळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे राहुल कदम, महावितरणचे गारगोटे व फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीचे सचिव दिलीप बटवाल, खजिनदार विनोद जैन, नाणेकर ग्रामपंचायतचे आबा नाणेकर, अग्रवाल पॅकेजिंगचे मनोज बंसल, ब्लॅक अँड डेकरचे अतुल घुमटकर, विनोद वर्मा, राकेश डाका, राजेश बटवाल, एमसीसीआयचे कोपर्डीकर आदींनी या पाहणी दौऱ्यात (Chakan) सहभाग घेतला.

या अभ्यास गटाने सर्वेक्षण करून अंमलबजावणीसाठी पुढील सूचना केल्या –

 

* पुणे नाशिक महामार्गावरील बंगला चौक मोठा करून डांबरीकरण करणे. कारण या ठिकाणी लांब व मल्टी एक्सेल वाहनांना टर्निंगसाठी अडचणी येतात, त्या दूर होतील.

*तळेगाव चौक येथे पादचाऱ्यांना रस्ता क्रॉस करण्यासाठी पादचारी पुल तयार करणे.

* तळेगाव चौकातील नाशिककडे जाणाऱ्या बसचा बस थांबा 100 मीटर पुढे नेणे.

*  तळेगाव चौकातील पुण्याकडे जाणाऱ्या बसचा बस थांबा 100 मीटर पुढे नेने.

* तळेगाव चौकातील पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या बस थांब्याजवळ साठलेले पाणी काढून टाकण्यासाठी नाणेकर ग्रामपंचायत ड्रेनेज तयार करून ते पाणी काढून देतील.

* तळेगाव चौकातील पुण्याहून महाळुंगेकडे वळणाऱ्या कॉर्नरवर असलेला ट्रांसफार्मर काढून त्या ठिकाणी अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल टाकणे. हा चौक मोठा करून डांबरीकरण करणे.

* तळेगाव चौकातील चाकण गावातून पुण्याकडे वळणाऱ्या चौकात कॉर्नरवर असलेले आरसीसी ड्रेनेजचे ओपनिंग काढून ते रस्त्याच्या लेव्हलला समतल तयार करणे व या ठिकाणी डांबरीकरण करून हा कॉर्नर मोठा करणे.

* पुणे नाशिक रोडवरील मुटकेवाडी चौक ते आंबेठाण चौक रोडवरील सर्विस रोडचे डिव्हायडर काढणे व सदर ठिकाणी डांबरीकरण करणे.

* आंबेठाण चौक मोठा करून डांबरीकरण करणे.

* आंबेठाण चौकातील तिन्ही कॉर्नरला टर्निंग कॉर्नरवर असलेले इलेक्ट्रिक पोल काढून टाकणे व या इलेक्ट्रिक वायर अंडरग्राउंड करणे व सदर ठिकाणी डांबरीकरण करणे व हा चौक मोठा करणे.

* आंबेठाण चौकातील पुण्याकडून आंबेठाणकडे वळणाऱ्या कॉर्नरवर असलेला नाला बंदिस्त करून त्या ठिकाणी समतल आरसीसी बांधकाम करून चौकाचे रुंदीकरण करणे.

आंबेठाण चौकातील चाकण गावातून पुण्याकडे वळताना असणाऱ्या कॉर्नरवरील इलेक्ट्रिक पोल काढून इलेक्ट्रिक लाईन अंडरग्राउंड करणे व त्या ठिकाणी चौकाचे रुंदीकरण करणे.

* आंबेठाण चौकातील चाकण गावातून पुण्याकडे वळताना असणाऱ्या कॉर्नरवरील नाला बंदिस्त करून त्यावर आरसीसी बांधकाम करून समतल करणे व रस्ता रुंदीकरण करणे.

* आंबेठाण चौक येथे पादचाऱ्यांसाठी रस्ता क्रॉस करण्यासाठी पादचारी पूल उभारणे.

* तळेगाव चौकात असलेला मजूर अड्डा चाकण मार्केट जवळील पीडब्ल्यूडीच्या जागेत (Chakan) स्थलांतरित करणे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.