Pune : धनकवडी येथे सदनिकेत लागलेल्या आगीत अडकलेल्या महिलेची अग्निशमन दलाकडून सुखरुप सुटका

एमपीसी न्यूज – काल (दि.28रोजी) धनकवडी येथील यहिल पॉईंट सोसायटीत पहिल्या( Pune) मजल्यावरील एका सदनिकेत आग लागून झालेल्या धूरात अडकलेल्या एका महिलेची  अग्निशमन दलाने सुखरुप सुटका केली.

अधिक माहिली अशी की,काञज अग्निशमन दलाला काल (दि. 28रोजी)  रात्री 9  वाजता धनकवडी येथील श्रीधर नगरमधील हिल पॉईंट सोसायटीतील पहिल्या मजल्यावर आग लागल्याची वर्दि मिळाली. वर्दि मिळताच अग्निशमन दलाकडून काञज व जनता अग्निशमन केंद्र येथून अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले.

Today’s Horoscope 29 October 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

घटनास्थळी पोहोचताच दलाच्या जवानांनी पाहिले असता पहिल्या मजल्यावर एका सदनिकेत आग लागून मोठ्या प्रमाणात धुर निर्माण झाला होता. त्याचवेळी तेथेच एका खोलीत एक महिला धुरामुळे अडकली असल्याने जवानांनी तातडीने बी ए सेट परिधान करत खोलीत प्रवेश करुन सदर महिलेला सुखरुप बाहेर घेतले.

तर इतर जवानांनी आगीवर पाण्याचा मारा करत सुमारे पंधरा मिनिटात आग पुर्ण विझवली. आग कशामळे लागली याचे नेमके कारण समजू शकले नसून आगीमधे सदनिकेचे मोठे नुकसान झाले असून गृहपयोगी वस्तु जळाल्या आहेत.

या कामगिरीत अग्निशमन अधिकारी सुभाष जाधव तसेच वाहनचालक विशाल बोबडे, ॠषी बिबवे व तांडेल वसंत भिलारे, संजय जाधव आणि जवान किरण पाटील, महेश गारगोटे, अजित लांडगे, निरंजन गायकवाड, संकेत शेलार, विनय निकम यांनी ( Pune)  सहभाग घेतला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.