Today’s Horoscope 29 October 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 29 October 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – रविवार.

29.10. 2023.

शुभाशुभ विचार- करी दिन.

आज विशेष- ग्रहण, करी दिन.

राहू काळ – सायंकाळी 4.30  ते 06.00.

दिशा शूल – पश्चिमेस असेल.

आजचे नक्षत्र – भरणी.

चंद्र राशी – मेष.

—————————–

मेष ( शुभ रंग- हिरवा )

आज अति उत्साहाच्या भरात तुम्ही काही चुकीचे निर्णय घ्याल. उपवर तरुण-तरुणींना सुयोग्य स्थळांचे प्रस्ताव येतील. एखाद्या समारंभात तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा चांगला प्रभाव पडेल.

वृषभ (शुभ रंग- मोरपिशी )

दिवस खर्चाचा असल्याने बचत शक्य नाही संध्याकाळी एखाद्या मॉलमध्ये फेरफटका माराल. अनावश्यक खरेदी कराल. प्रवासात एखादी चीज वस्तू गहाळ होऊ शकते.

मिथुन ( शुभ रंग- गुलाबी )

आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस. कमी श्रमातही जास्त लाभ पदरात पडण्याची शक्यता आहे. जिवलग मित्र दिलेले शब्द पाळतील. दिवसाच्या पूर्वार्धात लाभ.

कर्क (शुभ रंग- सोनेरी)

आज तुम्ही भावनेपेक्षा जास्त कर्तव्याला प्राधान्य द्याल. कार्यक्षेत्रात प्रगतीची चक्रे गतिमान राहतील. कामाच्या व्यापात आज महत्त्वाचे घरगुती प्रश्न दुर्लक्षित होतील.

सिंह (शुभ रंग-पिस्ता )

आज दैवाचे पाठबळ उत्तम असल्याने तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यशाची खात्रीच बाळगायला हरकत नाही. घरात एखादे धार्मिक कार्य करण्याचे बेत आखाल. वडीलधाऱ्यांचा मान राखाल.

कन्या ( शुभ रंग- केशरी)

हितशत्रू कदाचित मित्रांमध्येच लपलेले असू शकतील. कोणतीही धाडसाची कामे आज नकोत. कुणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. कोणतेही गैरवर्तन टाळा.

तूळ ( शुभ रंग- तांबडा)

कौटुंबिक वातावरण सामंजस्याचे असल्याने तुम्ही आज कार्यक्षेत्रातही आपले महत्त्व सिद्ध करू शकाल. अडचणीच्या प्रसंगी जोडीदाराची तुम्हाला खंबीर साथ असेल.

वृश्चिक (शुभ रंग- चंदेरी)

कोणतीच गोष्ट आज सहज साध्य नसली तरीही तुमची काही येणी असतील तर ती आज वसूल होण्याची शक्यता आहे. प्रयत्नांना आज दैवाचे पाठबळ नक्की मिळेल.

धनु (शुभ रंग-क्रीम)

कलाकार मंडळी प्रसिद्धीच्या झोतात राहतील. हौशी मंडळींना चैन करण्यासाठी पैसा उपलब्ध होईल. आज बरेच दिवसांनी मित्रमंडळींच्या सहवासात रमल.

मकर ( शुभ रंग- जांभळा )

आज काही घरगुती प्रश्नात लक्ष देणे तुम्हाला आवश्यक वाटेल. मुलांच्या अभ्यासातही डोकावणे गरजेचे आहे. काही रसिकामंडळी सहकुटुंब एखाद्या सहलीचे नियोजन करतील.

कुंभ (शुभ रंग – मोतिया)

शेजाऱ्यांशी झालेले मतभेद दूर होऊन संबंध सुधारतील. काही जणांना आज तातडीने प्रवासासाठी निघावे लागेल. घराबाहेर क्रोधावर लगाम ठेवा आईच्या आज्ञेत रहा.

मीन (शुभ रंग – पांढरा )

वाढत्या खर्चातही पैशाची कमतरता भासणार नाही. आज संध्याकाळी काही येणे अनपेक्षित पणे वसूल होईल. महत्त्वाच्या कामासाठी थोडी भटकंती होईल.

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क – 9689165424.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.