Chakan : पुर्व वैमनस्यातून बंदूक रोखत दिली गोळ्या घालण्याची धमकी

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाचा राग मनात (Chakan) धरून तुम्ही बस स्टॉपवर उभे रहायचे नाही म्हणत थेट बंदूक रोखत गोळ्या घालण्याची धमकी देण्यात आली आहे. हा सर्व प्रकार गुरुवारी (दि.1) दुपारी चाकण येथील शिक्रापूर रोडवरील बस स्टॉपवर झाला.

याप्रकऱणी हनुमंत राजाराम वाडेकर (वय 41 रा. डबरेवस्ती, खेड) यांनी फिर्याद दिली असून अशोक उर्फ बबु गोविंद वाडेकर (रा.बहुळ, खेड) याच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Pune : अभिनेता संकर्षण कऱ्हाडेचा नादच खुळा; बस चालकाची तब्येत बिघडली म्हणून स्वत: चालवली बस

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या भांडणाचा राग मनात धरून फिर्यादी यांचा (Chakan) भाऊ बाजीराव वाडेकर, पाहुणी महिला, वेदांत माने यांना तुम्ही बस स्टॉपवर उभा रहायचे नाही असे म्हणत आरोपीने वेदांत याला धक्काबुक्की केली. आरोपीने शिवीगाळ केली असता फिर्यादी व त्यांचे आईवडील जमा झाले व भांडणे विकोपाला गेले.

यावेळी आरोपीने घरात जाऊन छोटी बंदूक आणली व ती थेट फिर्यादी यांच्यावर रोखून माझ्या नादी लागायचे नाही तर गोळ्या घालीन अशी धमकी दिली. यावरून चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.