Chakan : दुचाकी घसरून पडल्याने तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – दुचाकी घसरून पडल्याने तरुण गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 5) दुपारी पुणे-नाशिक महामार्गावर भारत फोर्स कंपनी समोर घडली.

गोविंद दशरथ बिराजदार (वय 29, रा. भांसे, ता. खेड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अनिता सुग्रीव मर्तुळे (वय 35, रा. भांसे, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी मयत गोविंद बिराजदार हे त्यांच्या मोपेड दुचाकीवरून नाशिक-पुणे महामार्गावरून जात होते. ते कुरूळी येथील भारत फोर्स कंपनी जवळ आले असता त्यांची दुचाकी घसरली.

या अपघातात गोविंद गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.