Chakan : जनरेटरच्या कंपनीमधून पाऊण लाखाच्या कॉपर वायर चोरीला

Theft of copper wire worth Rs 1 lakh from the generator company

एमपीसी न्यूज – जनरेटरच्या कंपनीतून तीन चोरट्यांनी मिळून 74 हजार रुपये किमतीच्या कॉपर रिंगा आणि कॉपर केबल चोरून नेल्या. ही घटना 12 जून रोजी पहाटे दोन ते साडेचार वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील म्हाळुंगे येथे घडली.

प्रकाश कनीराम चव्हाण (वय 50, रा. गायकवाड नगर, दिघी) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गणेश बोरकर आणि त्याचे दोन साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चव्हाण यांची खेड तालुक्यातील म्हाळुंगे येथे सुजलान जनरेटर कंपनी आहे. 12 जून रोजी पहाटे दोन ते साडेचार वाजताच्या दरम्यान आरोपींनी कंपनीत प्रवेश केला. कंपनीतून 74 हजार रुपये किमतीच्या 60 किलोच्या दोन कॉपर रिंगा आणि 30 किलोच्या कॉपर केबल चोरून नेल्या.

चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.