Hinjawadi : हिंजवडीतून पिकअप, चिखलीतून दुचाकी चोरीला

Pickup from Hinjawadi, bike stolen from chikhali

एमपीसी न्यूज – हिंजवडी परिसरातून तीन लाखांचे पिक अप आणि चिखलीमधून 40 हजारांची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. याबाबत गुरुवारी (दि. 25) हिंजवडी आणि चिखली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

उमेश सीताराम पारखी (वय 39, रा. पारखी वस्ती, माण) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांचा तीन लाख रुपये किमतीचे एम एच 14 / सी पी 0004 पिक अप 24 जून रोजी रात्री आठच्या सुमारास वाकड येथे विलास जावडेकर यांच्या साईटवर पार्क केले.

रात्री अज्ञात चोरट्यांनी पिकअपचे लॉक तोडून चोरून नेले. हा प्रकार 25 जून रोजी सकाळी आठ वाजता उघडकीस आली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

सागर भरत धरम (वय 24, रा. घरकुल, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीची फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सागर यांनी त्यांची 40 हजार रुपये किमतीची हिरो कंपनीची दुचाकी (एम एच 14 / एच वाय 2712) 18 जून रोजी दुपारी स्पाईन रोड, कुदळवाडी, चिखली येथे बंद पडल्याने रस्त्याच्या बाजूला लॉक करून पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. 19 जून रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली.

चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.