_MPC_DIR_MPU_III

Weather Report : विदर्भात व मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊसाची शक्‍यता

Chance of torrential rains in Vidarbha and Ghats of Central Maharashtra.

एमपीसी न्यूज – राज्यात येत्या 24 तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार तर कोकण गोवा व मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

_MPC_DIR_MPU_IV

गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान : कोंकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. गोव्यासह राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडला.

गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) 1 सेंमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे :

कोकण आणि गोवा : केपे 20, रत्नागिरी 19, मडगाव 15, महाड, पणजी (गोवा) 14 प्रत्येकी, पेडणे, वाल्पोई 13 प्रत्येकी, राजापूर, सांगे, वेंगुर्ला 12 प्रत्येकी, गुहागर, मार्मगोवा, रोहा 11, कानकोना, लांजा, म्हापसा 10, कणकवली, कुडाळ, मालवण, संगमेश्वर देवरूख 9 प्रत्येकी, देवगड, दोडा मार्ग, माथेरान, पोलादपूर, वाडा 8, कर्जत, खालापूर, मंडणगड, सावंतवाडी, सुधागड पात्री, वैभववाडी 7 प्रत्येकी, चिपळूण, हरनाई, पेण, रामेश्वरगरी, विक्रमगड, भिरा , मुरुड ५ प्रत्येकी, मोखेडा 4, भिवंडी, जव्हार, कल्याण, म्हसळा, पालघर, पनवेल, तलासरी 3 प्रत्येकी, अलिबाग, अंबरनाथ, डहाणू, मुरबाड, शहापूर, श्रीवर्धन, ठाणे, उल्हासनगर, उरण 2 प्रत्येकी, बेलापूर (ठाणे), मुंबई ( कुलाबा) 1.

मध्य महाराष्ट्र : गगनबावडा 10, महाबळेश्वर 7, लोणावळा (कृषी) 6, मुक्तिनगर, शाहूवाडी 5 प्रत्येकी, पाटण 4, भोर, जळगाव, खेड राजगुरूनगर, कोरेगाव, पन्हाळा, पौड मुळशी, पुणे, राधानगरी, रावेर, सांगली, शिराळा, शिरोळ , तळोदा, वडगाव मावळ, यावल 3 प्रत्येकी, आजारा, अक्कलकुवा, आंबेगाव घोडेगाव, आटपाडी, भुसावळ, चांदगड, दहिवडी माण, दौंड, गारगोटी, हर्सून, इगतपुरी, जामनेर, जेऊर, करमाळा, सातारा, त्र्यंबकेश्वर, वेल्हे, वाळवा इस्लामपूर 2 प्रत्येकी, अकोले, बारामती, बार्शी, बोदवड, धारणगाव, एरंडोल, इंदापूर, जावली मेधा, कडेगाव, कराड, कोल्हापूर, माधा, मंगलवेढा, मिरज, मोहोळ,
नंदुरबार, नेवासा, ओझर, पंढरपूर, फलटण, पुरंदर सासवड, राहुरी, संगमनेर, सांगोला, शहादा, शिरूर घोडनदी, सोलापूर, सुरगाणा, तासगाव, वाई 1 प्रत्येकी.

मराठवाडा : माहूर 8, कळमनुरी 5, अर्धापूर, भोकरदन, भूम, चाकूर, हदगाव, हिंगोली, जाफराबाद, रेनापूर, सेनगाव 4 प्रत्येकी, औंधा नागनाथ, औरंगाबाद, हिमायतनगर, जिंतूर, कैज, उस्मानाबाद, उमरी 3 प्रत्येकी, औसा, बदनापूर, बिलोली, कंधार, लातूर, मुदखेड, परंडा, परभणी, परळी वैजनाथ, पाथरी, पूर्णा, शिरूर अनंतपाल, सिल्लोड, वसमत, वाशी 2 प्रत्येकी, अहमदपूर, अंबड, आष्टी, देगलूर, देवणी, धर्माबाद, गंगाखेड, गंगापूर, जळकोट, कन्नड, खुलताबाद, किनवट , लोहा, लोहारा, मुखेड, नायगाव खैरगाव, निलंगा, परतूर, पाटोदा, फुलंब्री, सेलू, सोयेगाव, सोनपेठ, उमरगा 1 प्रत्येकी.

विदर्भ : गडचिरोली 10, पौनी 9, भामरागड, दिग्रस, मालेगाव 7 प्रत्येकी, एटापल्ली 6, अहीरी, आर्णी, भिवापूर, चंद्रपूर, चिखली, धानोरा, कुरखेडा, लोणार, महागाव, मनोरा, मेहकर, साओली, शिंदेवाही, सिंधखेड, राजा, वाशीम 5 प्रत्येकी , अर्जुनी मोरगांव , चामोर्शी, चिमूर, देऊळगाव राजा , गोरेगाव, लखनपूर, मलकापूर, पुसद, साकोली 4 प्रत्येकी , आर्मोरी, ब्रह्मपुरी, बुलढाणा, देसाईगंज, खामगाव, कुही, लाखनी, मंगळुरपीर, मोदा, नंदुरा, रामटेक, रिसोड, सडकून अर्जुनी 3 प्रत्येकी, आमगाव, भद्रावती, देवळी, देवरी, गोंड पिपरी, कोरची, मोहाडी, मूल, मूल चेरा, नाग भीड, नागपूर, पातूर, सालेकसा, उमर खेड, वर्धा, वरोरा 2, अकोला, बाभुळगाव, बाळापूर, बल्लारपूर, भंडारा, दारव्हा , धामणगाव, हिंगणघाट, हिंगणा, जळगाव जामोद, जिवती, कंपटी, खरंगा, मोताळा, पर्सेनी, पोंभुणी, राजुरा, समुद्रपूर, सेलू, तिरोरा 1, ठाकूरवाडी, भिवपुरी 4  वाणगाव 3 प्रत्येकी,

पुढील हवामानाचा अंदाज:

_MPC_DIR_MPU_II

11-12 ऑगस्ट : कोकण गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

13-15 ऑगस्ट : कोकण गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

इशारा :

12 ऑगस्ट : विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार तर कोकण गोवा व मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता.

13 ऑगस्ट : कोकण गोवा, मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागात व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्‍यता.

14-15 ऑगस्ट : कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार, मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागात व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता. महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा
वाहण्याची शक्‍यता.

पुणे आणि आसपासच्या परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. मुंबई शहर व उपनगरात आकाश सामान्यतः ढगाळ राहून मध्यम तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.