Manthan Foundation : चंदादेवी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे मंथन फाउंडेशनचा सन्मान

एमपीसी न्यूज : चंदादेवी चॅरिटेबल ट्रस्ट (Manthan Foundation) आयोजित देवदासी – किन्नर सन्मानार्थ दिपावली मेळावा व स्नेहभोजनचे आयोजन करण्यात आले होते. महिलांना दिवाळी भेट देण्यात आली. तसेच, बुधवार पेठेत सामाजिक कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थाचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी ‘मंथन फाउंडेशन’च्या अध्यक्षा आशा भट्ट वेलणकर यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी प्रमुख उपस्थिती हिंदू राष्ट्र सेनेचे अध्यक्ष धनंजय देसाई, डॉ. अजय चंदनवाले (अध्यक्ष, मेडिकल असोसीएशन   महाराष्ट्र प्रदेश) चंद्रकांत कुलकर्णी, डॉ. अजय तावरे, अलका गुजनाळ, पन्ना व संजीव अग्रवाल (अध्यक्ष चंदादेवी चॅरिटेबल ट्रस्ट) व इतर सामजिक कार्यकर्ते उपस्थित होते. बुधवार पेठेतील देवदासी व किन्नर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Maharashtra Educational Institutions : संस्था, शाळांनी शैक्षणिक शुल्कासाठी अडवणूक करू नये – दीपक केसरकर

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.