Miss and Mrs. Maharashtra : पुण्यात मिस आणि मिसेस महाराष्ट्र 2022 स्पर्धेचे आयोजन

एमपीसी न्यूज – पुण्यातील झॅजमटॅज वर्ल्ड संस्थेतर्फे (Miss and Mrs. Maharashtra) यंदा पुण्यात मिस आणि मिसेस महाराष्ट्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 20 नोव्हेंबर रोजी पुण्यात रेसिडेन्सी क्लब येथे पार पडणार आहे. अशी माहिती झॅजमटॅज वर्ल्ड संस्थेचे संस्थापक साजिद शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी गतवर्षीच्या विजेत्या मिसेस इंडिया इंटरनॅशनल डॉ. मनिषा पाटील, मिसेस महाराष्ट्र हर्षाली कोलते, सारिका चव्हाण मिसेस दिवा ऑफ़ इंडिया उपस्थित होते.

शहरातील महिलांप्रमाणेच ग्रामीण भागातील महिलांमधेसुद्धा पुढे जाण्याची क्षमता असते. परंतु, त्यांना व्यासपीठ उपलब्ध होत नाही. त्यासाठी आम्ही शहरा बरोबरीने ग्रामीण भागात जाऊन ऑडिशन्स घेतो. तिथल्या महिलांना मुख्य प्रवाहात आणणे हेच आमच्या संस्थेचे उद्दीष्ट आहॆ. आमच्याकडे कराड आणि इचलकरंजीसारख्या छोट्या शहरातून आलेली स्पर्धक आज जागतिक स्तरावर विजेती झाली आहे. त्यामुळे आम्ही आमच्या ध्येयामध्ये काही प्रमाणात यशस्वी झालो आहोत, असे शेख म्हणाले.

मिस स्पर्धेसाठी वय 16 वर्षे पूर्ण आणि मिसेस स्पर्धेसाठी 18 वर्षे पूर्ण (Miss and Mrs. Maharashtra) आवश्यक आहे. ऑडिशन्स विनामूल्य असून इच्छुक स्पर्धकांनी अधिक माहितीसाठी संस्थेच्या सोशल मिडिया पेजवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन शेख यांनी केले आहॆ.

Manthan Foundation : चंदादेवी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे मंथन फाउंडेशनचा सन्मान

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.