Pune Crime : दहा गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारावर तडीपारीची कारवाई

एमपीसी न्यूज – पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेला व दहा गंभीर गुन्हे दाखल (Pune Crime) असलेल्या सराईताला बिबेवाडी पोलिसांनी पुणे जिह्ल्यातून दोन वर्षासाठी तडीपार केले आहे. बापु उर्फ परशुराम अरूण जानराव (वय 43 रा. बिबेवाडी) असे तडीपारीची कारवाई झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानराव याच्यावर 2007 पासून आज अखेरपर्यंत बिबेवाडी पोलीस ठाणे, सहकारनगर पोलीस ठाणे, दत्तवाडी पोलीस ठाणे या तीन पोलीस ठाण्यात एकूण दहा गंभीर गुन्हे दाखल आहेत. यामध्ये बेकायदा शस्त्र बाळगणे, परिसरात दहशत पसरवणे, गुंडासह नागरिकांना अडवून त्यांना मारहाण करणे, दमदाटी करणे, धमकी देऊन शस्त्राचा धाक दाखवून लुटणे, त्याच्या दहशतीमुळे नागरिकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासही टाळाटाळ केली.

त्याच्या या वाढत्या मुजोरीला व दहशतीला आळा घालण्यासाठी बिबेवाडी पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली असून यानुसार त्याला पुणे व पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या (Pune Crime) परीक्षेत्रातून दोन वर्षा करीता तडीपार करण्यात आले आहे. यानंतर तो संबंधित क्षेत्रात दिसल्यास नागरिकांनी त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Miss and Mrs. Maharashtra : पुण्यात मिस आणि मिसेस महाराष्ट्र 2022 स्पर्धेचे आयोजन

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.