NCP-Congress : राष्ट्रवादी आणि काँग्रेसची युती तुटणार? 22 आमदार फडणविसांच्या संपर्कात; ‘या’ मोठ्या नेत्यांचे संकेत!

एमपीसी न्यूज : उद्धव ठाकरेंची शिवसेना तुटल्यानंतर (NCP-Congress) आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसची युती तुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उद्धव सेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी काँग्रेसला इशारा दिला आहे की, त्यांच्या पक्षाचे 22 आमदार देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहेत, तर शिंदे सेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे 12 आमदार त्यांच्यासोबत असल्याचा दावा केला आहे.

खैरे आणि शहाजी बापू यांच्या वक्तव्यानंतर आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही हल्लाबोल केला आहे. सत्तेत असताना ज्यांना आपला पक्ष सांभाळता आला नाही, त्यांनी इतर पक्षांबद्दल बोलू नये, तर बरे होईल, असे ते म्हणाले. काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी खैरे यांनी माफी मागावी अशी मागणी केली. तर ते ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते असल्याचे सांगितले. त्यांनी असे वक्तव्य का केले, याचा खुलासा व्हायला हवा.

‘आता शिंदे-फडणवीस सरकार पडणार’ – NCP-Congress

शिंदे-फडणवीस सरकार दोन दिवसांत पडणार असल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिर्डीत आयोजित विचारमंथन शिबिरात सांगितले. शिर्डीतील काँग्रेसच्या शेवटच्या अधिवेशनानंतर महाविकास आघाडीचे सरकार पडले. म्हणजेच शिर्डीत कोणत्याही पक्षाचे अधिवेशन झाले, की सध्याचे सरकार पडते. आता शिंदे-फडणवीस सरकार पडणार. असे त्यांनी जरी म्हंटले असले तरी आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसची युती पडल्याचे दाट संकेत दिसत आहेत.

काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते संपर्कात : महाजन

महाराष्ट्र सरकारमधील मंत्री गिरीश महाजन (NCP-Congress)यांनी त्यांच्या नांदेड दौऱ्यात सांगितले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक नेते त्यांच्या संपर्कात आहेत. ते मोठे नेते फक्त इथलेच नाहीत तर इतर ठिकाणचेही आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादीसह अन्य पक्षांच्या नेत्यांना आपले भविष्य अंधकारात दिसत आहे.

Andheri Bypoll Result : अंधेरी पोटनिवडणुकीचा आज लागणार निकाल!

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.