Talegaon Dabhade: मुस्लिम युवकांकडून गरजू कुटुंबाना मदतीचा हात 

एमपीसी न्यूज – भारतात कोरोनाचे विषाणूचे संकट ओढवले असल्याने संपर्ण देशात लाॕकडाऊन करण्यात आला आहे. कुणालाही घराबाहेर पडता येत नसल्याने हातावर पोट असणाऱ्यांना याचा सर्वात जास्त त्रास सहन करावा लागत आहे. या परिस्थितीत रोजगार नसल्याने या बांधवाना एक मदतीचा हात म्हणून अन्नधान्यांचे वाटप करण्यात आले.

माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचे सहकारी साजिद शेख, उद्योजक सोहेल शिकीलकर, इरफान नालबंद यांनी पुढाकार घेऊन तळेगाव दाभाडे गावातील गरजू कुटुंबाना तांदुळ, पीठ, डाळ, हळद, तेल, साखर,मिरची अशा जीवनावश्यक असणाऱ्या विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले.

कुठलीही जात-पात न पाहता प्रत्येक गरजू कुटुंबाना मदत देण्याचा आमचा संकल्प असून ज्याला जे श्यक्य होईल तशी मदत करून देशसेवेत सहभाग घ्यावा असे आवाहन यावेळी केले यावेळी मुस्लिम समाजातील सर्वांना केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.