Traffic rules: चांदणी चौकातील वाहतूक कोंडीवर तोडगा, नवीन वाहतूक नियम जारी

एमपीसी न्यूज: चांदणी चौकातील वाहतूक कोंडी कमी करून सुरळीत व सुरक्षित करण्यासाठी नवीन वाहतूक नियम जारी करण्यात आले आहेत. (Traffic rules) पिंपरी-चिंचवडचे वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त आनंद भोईटे यांनी वाहतूक नियमनाचे नवीन आदेश निर्गामित केले असून हे आदेश प्रायोगिक तत्वावर 26 ऑगस्ट पासून लागू होणार आहेत.

हिंजवडी वाहतूक विभागाच्या हद्दीत चांदणी चौक व सुस खिंड येथे उड्डाणपूल व रस्त्याची काम सुरू असल्याने उर्वरित रस्ते पादचारी नागरिक व सार्वजनिक वाहतुकीस अपुरे पडत आहे.(Traffic rules) त्यामुळे सकाळ व सायंकाळच्या सत्रात चांदणी चौक, बावधन, पाषाण तलाव भागात मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असल्यामुळे येथे नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे आनंद भोईटे, पोलीस उप आयुक्त, वाहतूक शाखा, पिंपरी-चिंचवड शहर यांनी तात्पुर्त्या स्वरूपात वाहतूक नियमांचे नवीन आदेश निर्गामित केलेले आहेत. हे आदेश प्रायोगिक तत्वावर 26 ऑगस्ट पासून लागू होतील.

Crime News : पत्नीला लॉजवर गेल्याची माहिती दिली म्हणून काचेची बाटली डोक्यात फोडली

पाषाण व बावधन कडून पौड आणि कोथरूड कडे जाणारी वाहतूक चांदणी चौक ब्रिज वरून एनडीए रोड वरून संध्याकाळी 6:00 ते रात्री 9 वा चे दरम्यान या होते.(Traffic Police) यापूर्वी एकेरी मार्ग असणाऱ्या आदेशामध्ये संध्याकाळी सहा ते रात्री नऊ या वेळेमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. पाषाण कडून बावधन रोडने चांदणी चौकाकडे जाणाऱ्या जड वाहनांना संध्याकाळी 6:00 ते रात्री 9 वा या वेळेस शिंदे पेट्रोल पंपापासून पुढे जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

कोथरूड अंडरपासकडून एनडीए रोड मार्गे बावधन रोड वर जाण्यास जड वाहनांना मनाई करण्यात आली आहे. बावधन कडील हलक्या वाहनांना चांदणी चौक (Traffic Police) ब्रिजवरून एनडीए रोड मार्गे खाली उतरून अंडरपासने कोथरूड पुणे कडे जाण्यास तसेच पौड रोडवरील हलक्या वाहनांना एनडीए रोड मार्गे खाली उतरून अंडरपासने कोथरूड पुणे कडे जाण्यास  संध्याकाळी 6 वा ते रात्री 9 वा दरम्यान परवानगी देण्यात आली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.