Subway Pune : भुयारी मार्गामध्ये होणारे गैरप्रकार थांबवा, राष्ट्रवादी युवक यांची मागणी

एमपीसी न्यूज – पुण्यात नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी भुयारी मार्ग (Subway Pune) करण्यात आले आहेत. मात्र, तेथे घाणीचे साम्राज्य पसरले असून तेथे जुगारी लोकांचे अड्डे बनत चाललेले आहेत. यावर प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी असे निवेदन राष्ट्रवादी युवक कोथरूड यांनी केले आहे. हे निवेदन पुणे महापालिका व कोथरूड पोलीसांना दिले आहे.

विरुद्ध राष्ट्रवादी युवक कोथरूड चे अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी कोथरूड पोलिस ठाणे येथे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब बडे यांना व पुणे महानगरपालिकेत मुख्य अभियंता श्रीनिवास बोलाना यांना निवेदन देऊन या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे संकेत शिंदे ,ऋषिंकेश शिंदे आदि पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Traffic rules: चांदणी चौकातील वाहतूक कोंडीवर तोडगा, नवीन वाहतूक नियम जारी

या निवेदनात म्हटले आहे की, पुण्यात बऱ्याच ठिकाणी महानगरपालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी रस्ता ओलांडण्यासाठी लाखो रुपये खर्चून भुयारी मार्ग बनवले आहेत. पण ज्या कारणासाठी हे मार्ग बनवले आहेत. त्या व्यतिरिक्त इतरच गोष्टींसाठी ते वापरले जात आहेत. समाज कंटक अश्या भुयारी मार्गांचा वापर स्वतःचे ‘अड्डे’ म्हणून करत आहेत, असेच चित्र अनेक ठिकाणी दिसते. काही भुयारी मार्गांना सार्वजनिक मुतारीचे स्वरूप आलेले आहे, तर काही ठिकाणी पत्त्यांचे डाव रचले जातात, तर काही ठिकाणी काही लोक खुशाल दारू पीत बसतात. महापालिकेने नेमलेले सुरक्षा रक्षक कधीच भुयारी मार्गाच्या प्रवेशाला उपस्थित नसतात. अश्या मार्गांचा वापर वास्तविक स्त्रिया, गरोदर महिला व अबालवृद्ध नागरिक सुरक्षितरित्या रस्ता ओलांडण्यासाठी करू शकतात. पण, तिथे चालत असलेल्या गचाळ कारभारामुळे नागरिक जाण्याचे टाळतात.

भुयारी मार्गात (Subway Pune) चालू असलेली गुन्हेगारी रोखून, साफ सफाई करून ते मार्ग सर्वसामान्य जनतेसाठी लवकरात लवकर चालू करावे, अशी विनंती गिरीश गुरूनानी यांनी केली. या वेळी वेळेतच उपायोजना न केल्यास आंदोलनाचा इशारा देखील गिरीश गुरनानी यांनी प्रशासनाला दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.