Pimpri News : तरुणाला कस्टमर केअरला फोन करणे पडले महागात

एमपीसी न्यूज – मदतीसाठी म्हणून कस्टमर केअरला फोन केला अन् तोतया कस्टमर केअरवाल्याने तरुणाची थेट 45 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. हा प्रकार 15 सप्टेंबर 2020 रोजी रात्री काळभोरनगर येथे ही घटना घडली असून याबाबत गुरुवारी (दि.25) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेनडन क्रिस्टो रॉड्रिक्स (वय 26, रा. काळभोरनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 916291569698 क्रमांकावरून बोलणा-या अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी मासे खरेदी केल्यानंतर गुगल पे द्वारे त्याचे पैसे दिले. फिर्यादी यांच्या खात्यातून पैसे वजा झाले. मात्र मासे विक्रेत्याच्या खात्यात ते जमा झाले नाहीत. याबाबत तक्रार करण्यासाठी फिर्यादी यांनी गुगलवर फोन पेचा कस्टमर केअर नंबर शोधला. तिथे फोन पे कस्टमर केअरचा नंबर म्हणून त्यांना आरोपीचा नंबर मिळाला. फिर्यादी यांनी संपर्क केला असता आरोपीने पैसे परत जमा करण्याचे आश्वासन देऊन त्यांना बोलण्यात गुंतवले. दरम्यान त्यांना गुगल पेवर काही आकडे आणि मेसेज टाईप करण्यास सांगितले आणि चलाखीने फिर्यादी यांच्या वडिलांच्या खात्यातून 45 हजार 525 रुपये काढून फसवणूक केली.याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पिंपरी पोलीस पुढिल तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.