Talegaon-Dabhade: तळेगाव-दाभाडे परिसरात ज्येष्ठ नागरिक महिलेचा मृतदेह अढळल्याने खळबळ

एमपीसी न्यूज : तळेगाव-दाभाडे शहरातील एका ओढ्या जवळ दुपारच्या सुमारास ज्येष्ठ नागरिक महिलेचा मृतदेह अढळून आला आहे.(Talegaon-Dabhade) शहरातील राजगुरू कॉलनी मागील ओढ्यामध्ये या महिलेचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. त्यामुळे तात्काळ घटनास्थळी पोहचून मृतदेह बाहेर काढण्यात आला अशी माहिती ग्राम सुरक्षा दलाचे निलेश गराडे यांनी दिली.

तळेगाव-दाभाडे येथील एका ओढ्यात दुपारी सापडलेल्या ज्येष्ठ नागरिक महिलेच्या मृतदेहाची ओळख पटली आहे. नारायण पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक, तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे यांनी सांगितले की, संध्या भालेराव, वय अंदाजे 60 ते 62 वर्षे यांचा मृतदेह दुपारी 2:00 वाजता राजगुरू कॉलनी मागील ओढ्यात सापडला होता. त्या एक सेवानिवृत्त शिक्षिका होत्या. त्या परांजपे शाळेजवळील शिक्षणासाठी मध्ये राहत होत्या.(Talegaon-Dabhade) त्यांच्या नातेवाईकांनी व शेजाऱ्यांनी सांगितले की त्यांना मानसिक आजार होता व त्यासाठी उपचार चालू होते. त्यांना एक मुलगा असून त्याला सुद्धा मानसिक आजार आहे.”

पाटील पुढे म्हणाले की, “सकाळी त्या काहीतरी कामानिमित्त घराबाहेर पडल्या पण नंतर आल्याच नाही. त्या कदाचित ओढ्या जवळ गेल्या असाव्यात व पाय घसरून त्यामध्ये पडल्या असाव्यात. त्यांचा मृतदेह शव विच्छेदनासाठी तळेगाव दाभाडे मधील जनरल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे. मृत्यूचे नेमके कारण शव विच्छेदन अहवाल आल्यानंतरच कळेल.”

Shravan: श्रावण महिन्यातील पोथी वाचन म्हणजे एक चालते बोलते विद्यापीठ !

त्यापूर्वी ग्राम सुरक्षा दलाचे निलेश गराडे म्हणाले की, “आज दुपारी 1 वा चे सुमारास स्थानिक लोकांनी कळवले की एक मृतदेह शहरातील राजगुरू कॉलनी मागील ओढ्यामध्ये तरंगत आहे.(Talegaon-Dabhade) त्यामुळे आम्ही लगेच तेथे पोहचलो. ओढ्यात पाणी वाहते होते पण फक्त गुडघाभर खोल होते. तळेगाव-दाभाडे पोलीस ठाण्याचे अधिकारी सुद्धा तिथे आले होते. आम्ही मृतदेह पाण्याबाहेर काढला.”जवळ दिला असेल असाव्यात व पाय घसरून त्या कदाचित ओढ्याजवळ पोहोचल्या व त्यामध्ये पडल्या.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.