Pune News : यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या योगशिबिर स्पर्धेत चंद्रकांत भापकर प्रथम

एमपीसी न्यूज – सातव्या जागतिक योग दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने योगशिबिर स्पर्धेचे आयोजन केले गेले होते. या योगशिबिर स्पर्धेत चंद्रकांत भापकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या आरोग्यविज्ञान विभागातर्फे योगशिक्षक पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी “कोविड काळातील योगाभ्यास” या विषयावर योगशिबिर आधारित होते. या स्पर्धेमध्ये न्यू एज्युकेशन सोसायटी, (केंद्र संकेतांक 62425) पुणे या अभ्यास केंद्रातील योगशिक्षक पदविका अभ्यासक्रमाचे विद्यार्थी चंद्रकांत सदाशिव भापकर यांना प्रथम क्रमांक प्राप्त झाला.

तसेच, अभ्यास केंद्रालाही विद्यापीठाचे उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. सर्व विद्यार्थ्यांना केंद्र संचालक प्रा. सुवर्णा भापकर, प्रा. सानिका बाम व प्रा. डॉ. भक्ती नीलेश महाजन यांनी मार्गदर्शन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.