Pune : कोरेगाव पार्क भागातील वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज – कोरेगाव पार्क भागातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी अनेक रस्त्यांवरील वाहतूकमार्गामध्ये बदल करण्यात आला आहे. गेल्याच आठवड्यात कोरेगाव पार्क येथे हॉटेलच्या बाहेर ‘नो पार्किग’मध्ये गाड्या लावणा-यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली होती. त्यानंतर हे बदल करण्यात आले आहेत.
रस्त्यांवर गेलेले बदल

कोरेगाव पार्क चौक या चौकातून नॉर्थ मेन रोडकडून महात्मा गांधी जंगशनकडे वळण्यास बंदी. ताडीगुत्ता चौकातून गणपत बुधाजी पिंगळे रस्त्याने पासपोर्ट  ऑफिसकडे वळण्यास बंदी. गल्ली क्रमांक ७ मदारी समाज महासंघ रिक्षा स्टॅण्ड ते ब्लॉसम सोससायटी कंपाऊंड कॉर्नरपर्यंत दक्षिणेस ‘नो पार्किग’, उत्तरेस समांतर पार्किग. जहांगीर चौक मंगलदास चौकीकडून येणा-या वाहनांना जहांगीर चौकात टर्नला बंदी.
या वाहनांना एसएसपीएमएस कॉलेज येथून यू टर्न घ्यावा. गल्ली क्रमांक ५ येथे पश्चिमेस नो पार्किग’, तर पूर्वेस समांतर पार्किग, गल्ली क्रमांक ६ येथे पूर्वेस समांतर पार्किग व पश्चिमेस ‘नो पार्किंग’, गल्ली क्रमांक ८ उत्तरेस ‘नो पार्किग व दक्षिणेस समांतर पार्किंग, पासपोर्ट ऑफिस ते गंगा ऑर्चिड सोसायटी येथे पी-१, पी-२ करण्यात आले आहे. नॉर्थन रोडवर पूर्वेस समांतर व पश्चिमेस ‘नो पार्किग’, श्रीराम चौक ते कोरेगाव पार्क चौक या दोन्ही बाजूंना ‘नो पार्किग केले आहे.
श्रीराम चौक ते कोरेगाव पार्क चौकापर्यंतचा रस्ता एजेरी वाहतुकीसाठी असणार आहे. अर्जुन मनसुखनी रस्ता येथे रेल्वे कंपाऊंड ते साधू वासवानी पूल संपेपर्यंत एकेरी वाहतूक असेल आणि साधू वासवानी पुलावरून यू टर्न घेण्यास बंदी. श्रीराम चौक ते हॉटेल सिटी पॉइंटपर्यत दक्षिणेस ‘नो पार्किग व उत्तरेस समांतर पार्किग.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.