Charholi : चऱ्होली खुर्दमध्ये कचऱ्याच्या धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

एमपीसी न्यूज –  च-होली खुर्दमधील  आळंदी मरकळ (Charholi)  रस्त्याच्या कडेने काही बेशिस्त नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात तेथे कचरा फेकला जातो.त्या कचऱ्यास अज्ञात व्यक्तींकडून आग लावली जाते. तसेच त्या कचऱ्याच्या ठिकाणी विद्युत वाहिनीचे पोल सुद्धा आहे. वारंवार  तेथील कचऱ्याला लागणाऱ्याक त्या आगीमुळे तिथे दुर्घटनेची शक्यता  नागरिकांनी वर्तवली आहे.

तसेच सदर ठिकाणी कचरा टाकू नये. टाकल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.या आशयाचा फलक लिहिलेला असून सुद्धा तिथे मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येत आहे. आज दि.3 रोजी तेथील कचऱ्यास अज्ञात व्यक्तीकडून आग लावण्यात आली त्यामुळे तेथील परिसरात कचऱ्याचा धूर पसरून वायू प्रदूषण होत होते.तसेच त्या रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना त्या धुराचा त्रास होत होता.

 च-होली  ग्रामपंचायत हद्दतील वडगांव रस्ता, मरकळ रस्ता, च-होली  धानोरे रस्ता,  च-होली पुल (इंद्रायणी नदी लगत )अश्या विविध ठिकाणी असलेल्या कचऱ्यास वारंवार आग लावली जात आहे. त्या लागलेल्या कचऱ्याच्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात त्या कचऱ्याचा धूर निघतो व मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होते. त्यामुळे नागरिकांना श्वसन विकार समस्या व इतर आरोग्याच्या समस्या उद्भवतात. त्यामुळे तेथील परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात (Charholi)  आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.