Hinjawadi : साईड देण्याच्या कारणावरून एकास मारहाण करून लुटले

एमपीसी न्यूज – एका कार चालकासोबत साईड देण्याच्या ( Hinjawadi) कारणावरून वाद घालून चार जणांनी मिळून त्यास बेदम मारहाण केली. त्यानंतर सोन्याची चैन आणि रोख रक्कम असा एक लाखांचा ऐवज जबरदस्तीने चोरला. कारची तोडफोड करत कारचे नुकसान केले. याप्रकरणी चार जणांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 1) रात्री अकरा वाजताच्या सुमारासम बेंगलोर मुंबई महामार्गावर ताथवडे येथे घडली.

अक्षय सुदाम सुतार (वय 24), विजय अशोक जाधव (वय 24), स्वप्निल लक्ष्मण खांडवे (वय 23, तिघे. रा. म्हाळुंगे, ता. मुळशी), दीपक सुनील कड (वय 23, ता. हवेली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी कुणाल सुनील भुजबळ (वय 22, रा. पुनावळे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Talegaon : मुलींच्या सांगण्यावरून एकास बेदम मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांचे दुकान बंद करून कारमधून घरी जात होते. बेंगलोर मुंबई महामार्गावर ताथवडे येथे साईड देण्याच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादी सोबत वाद घातला. त्यांना शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.

लोखंडी रॉड आणि पाणी पिण्याच्या स्टीलच्या बाटलीने मारहाण करून त्यांच्या डोक्यात आणि चेहऱ्यावर गंभीर दुखापत केली. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांच्या गळ्यातील 80 हजार रुपये किमतीची सोन्याची चैन आणि 20 हजार रुपये रोख रक्कम जबरदस्तीने चोरून घेतली. जाताना फिर्यादी यांच्या कारवर दगड मारून कारचे नुकसान केले. तसेच इथून गुपचूप निघून जा नाहीतर तुला सोडणार नाही, अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत ( Hinjawadi) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.