Charholi News : चऱ्होली येथे फुल विक्रेत्यावर गोळीबार

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या रागातून दोघांनी फुल विक्रेत्या तरुणावर (Charholi News) गोळीबार केला आहे. ही घटना शनिवारी मध्य रात्री चऱ्होली येथील चोवीसावाडी येथे घडली आहे.
याप्रकऱणी पोलिसांनी हरिओम पांचाळ (वय 20 रा.आळंदी देवाची) व हरीओमचा साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल केला असून सिद्धेश सिताराम गोवेकर (वय 28 रा.वडमुखवाडी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Maval : महावितरणच्या कामशेत कार्यालयात अनागोंदी कारभार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या दुचाकीवरून घरी जात असताना आरोपींनी फिर्यादीला बस स्टॉप जवळ जुन्या भांडणाच्या रागातून पाठलाग करण्यास सुरुवात केली. तसेच हरीओम याने त्याच्याकडे असलेल्या बंदुकीतून फिर्यादीच्या दिशेने दोन गोल्या झाडत जिवे मारण्याचा प्रय़त्न केला. यावरून दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील (Charholi News) तपास करत आहेत.