Charholi shiv mandir : शिवमंदिरांत भाविकांची गर्दी चऱ्होलीत 11 हजार 111 पंचमुखी रूद्राक्षाचे वाटप

एमपीसी न्यूज: श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी पिंपरीचिंचवड शहरातील विविध शिवमंदिरांत भाविकांनी श्रींच्या दर्शनासाठी गर्दी झाली होती. (Charholi shiv mandir) मंदिर परिसरांत रांगा लावून भाविकांनी मंदिरात श्रींचे दर्शन घेतले. परंपरेने मंदिरात शिवअभिषेक पूजा, दर्शन, महानैवेद्य, बेलपान वाहत भाविकांनी श्रींची पूजा करण्यासाठी शिव मंदिरांत गर्दी केली होती.

येथील चऱ्होली बुद्रुक मध्ये श्रावणी सोमवार निमित्त ग्रामदैवत वाघेश्वर महाराज मंदिरात शिव दर्शनास भाविकांची गर्दी झाली होती.( Charholi shiv mandir) भाविकांनी मंदिरात मोठ्या उत्साहात श्रीनां अभिषेक केला. भाविकांना मंदिरात देवस्थान तर्फे केळी, तसेच उपवासाच्या फराळाचे वाटप प्रसादात करण्यात आले. मंदिरावर श्रावण निमित्त लक्षवेधी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

 

मंदिर परिसर सुशोभित करण्यात आल्याने मंदिर परिसर पर्यटन केंद्र ठरला आहे.(Charholi shiv mandir) यावेळी शिव मंदिरातील शिव पिंडीवर अनेक भाविकांनी बेलपत्र, मुग व शुभ्र पुष्प वाहिली. तर काही भाविकांनी मंदिरात शिवाभिषेक केला. भाविकांचे शिव दर्शन झाल्यानंतर मंदिरात देवस्थान तर्फे केळी व इतर उपवासाचा महाप्रसाद देण्यात आला.

Rajesh patil: सर्वांनी शून्य कचरा उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे – राजेश पाटील 

श्रावण महिन्यात चऱ्होलीसह परिसरातील मोठ्या संख्येने भाविक परिवारासह शिव मंदिरांत दर्शनासाठी येतात. च-होली श्री वाघेश्वर मंदिर मुख्य प्रवेशद्वार जवळ मंदिराच्या माहितीचा दर्शनी फलक लावण्यात आला आहे. च-होलीतील श्री वाघेश्वर मंदिर महानस्थळ ओळखले जाते. (Charholi shiv mandir) दाभाडे कुटुंबातील मूळ पुरुष बज पाटील याचा मुलगा सोमाजी यांचा मुलगा कृष्णाजी दाभाडे यांनी श्री वाघेश्वर मंदिर बांधले असून ते इ.स.1725 ला येथील मंदिर टेकडीवर विकसित केले आहे. मंदिराचा जीर्णोद्धार चऱ्होली बुद्रुक मधील ग्रामस्थानी सुरु केला. यास पिंपरी चिंचवड महानगर पालिकेने विशेष सहकार्य केले आहे. येथील मंदिरात शेकडो वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वर महाराज येत असत.

प्रत्येक श्रावण सोमवारी दर्शनास भाविकांची प्रचंड गर्दी होत असते. येथील उद्योजक राघुशेठ पठारे यांचे वतीने भाविकांना फराळ केळी वाटप करण्यात आले.(Charholi shiv mandir) आचारी कैलास सरोदे याचें वतीने साबुदाणा वडे व चटणीचा महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. जालिंदर जोरे याच्यांकडून पंचमुखी रुद्राक्षाचे भाविकांना मोफत वाटप करण्यात आले.

जाग्रृत देव श्री वाघेश्वर स्वकाम सेवा मडंळ (रजिस्टर) व ग्रामस्थाच्या माध्यमातून देखभाल, जिर्णोद्धार,करत असल्याची माहिती अध्यक्ष संचालक काळूराम पठारे यांनी दिली, श्री वाघेश्वर महाराज देवस्थान मध्ये तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त शिवभक्त काळूराम पठारे, कृष्णकांत तापकीर, ॲड. जालिंदर जोरे, वैष्णवी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित तापकीर यांच्याकडून श्री चरणी पितळी मुखवटा अर्पण करण्यात आला आहे.(Charholi shiv mandir) ॲड जालिंदर जोरे यांच्या वतीने ११ हजार १११ पंचमुखी रूद्राक्ष वाटप महंत श्री श्री श्री लक्ष्मणनाथ यांच्या हस्ते करण्यात आले. मामा सरोदे आणि राघु पठारे यांच्या वतीने प्रसाद वाटप सेवा रुजू करण्यात आली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.