Extortion case: बारमध्ये घुसून खंडणी मागणाऱ्या चौघांना अटक

एमपीसी न्यूज : बारमध्ये कोणत्याही प्रकारचा पास न घेता घुसून शिवीगाळ करत खंडणी मागणीतली व खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.(Extortion case) याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना 8 आणि 15 ऑगस्ट रोजी पिंपळे गुरव येथील टिटॉस रेस्टोरंट अँड बारमध्ये घडली.

आशु उर्फ आसिफ हैदर हाफसी (वय 23, रा. कासारवाडी), अत्तु उर्फ फैजल इस्माईल शेख (वय 27, रा. कासारवाडी), अॅग्नल उर्फ केविन जॉर्ज ऍंथोनी (वय 29, रा. पिंपळे गुरव), सुमेरसिंग हरजितसिंग मान (वय 23, रा पिंपळे गुरव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी विकास अनिल सेवानी (वय 25, रा. पिंपरी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Charholi shiv mandir : शिवमंदिरांत भाविकांची गर्दी चऱ्होलीत 11 हजार 111 पंचमुखी रूद्राक्षाचे वाटप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पिंपळे गुरव येथील टीटॉस रेस्टोरंट अँड बारमध्ये कोणत्याही प्रकारचा पास न घेता बळजबरीने आत आले.(Extortion case) त्यांनी शिवीगाळ करून 30 हजार रुपयांची खंडणी मागितली. ऍंथोनी याने त्याच्या कमरेला हात लावून हत्यार लपवल्याचे भासवून जीवे मारण्याची धमकी दिली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.