Talegaon-Dabhade Fraud: बदनामीची भीती दाखवत सहकाऱ्यानेच महिलेला पावणे चार लाखांना लुटले

एमपीसी न्यूज : एकत्र काम करणाऱ्या सहाकारी कर्मचाऱ्यानेच महिलेला बदनामीची भिती दाखवत तब्बल पावणे चार लाख रुपये उकळले आहेत.(Talegaon-dabhade Fraud) ही घटना मार्च 2018 ते 24 जून 2022 या कालावधीत बँक ऑफ महाराष्ट्र, सोमाटणे येथे घडली.

PMPML : पीएमपीएमएलतर्फे 6 दिव्यांग सेवकांना तीन चाकी स्कूटरचे वाटप

संदीप रामदास ढम (वय 37, रा. सोमाटणे, ता. मावळ) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 37 वर्षीय महिलेने सोमवारी (दि. 15) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एका हॉस्पिटलमध्ये एकत्र काम करत होते.(Talegaon-dabhade Fraud) आरोपीवर फिर्यादीची वाईट नजर होती. त्यातून त्याने फिर्यादींसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. सोमाटणे येथील बँक ऑफ महाराष्ट्र येथे आरोपीने फिर्यादीकडून बदनामी करण्याची भीती दाखवून तीन लाख 70 हजार रुपये घेतले. तळेगाव-दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.