Jeevansathi Site : जीवनसाथी मेट्रोमोनीयल साईटवरून महिलेची फसवणूक

एमपीसी न्यूज – जीवनसाथी मेट्रोमोनीयल साईटवरून ओळख झालेल्या व्यक्तीने आणि त्याच्या दोन साथीदारांनी महिलेकडून पैसे घेऊन तिची दहा लाखांची (Jeevansathi Site) फसवणूक केली. तसेच लग्नाच्या आमिषाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार मे 2022 ते 6 सप्टेंबर 2022 या कालावधीत हिंजवडी येथे घडला.

जावेद शफी काझी (वय 34, रा. फोंडा, गोवा), महिला (वय 55), शशीधर कुमार (वय 26) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पीडित महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी काझी याने फिर्यादींसोबत मे महिन्यात जीवनसाठी मेट्रोमोनीयल साईटद्वारे ओळख केली. तो स्वतः मोठा व्यावसायिक असल्याचे भासवून त्याने फिर्यादीचा विश्वास संपादन केला. फिर्यादींसोबत लग्न करणार असल्याचे आश्वासन देऊन त्याने (Jeevansathi Site) फिर्यादीवर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर फिर्यादींसोबत लग्न न करता त्यांची फसवणूक केली.

Pimpri : गणपती मिरवणुक पाहणे पडले महागात, पिंपरीत 13 लाखांची घरफोडी

फिर्यादी आणि त्यांच्या घरच्यांचा विश्वास संपादन करून व्यवसायात गरज असल्याचे सांगत फिर्यादीकडून ऑनलाईन माध्यमातून 12 लाख 75 हजार रुपये घेतले. त्यातील दोन लाख 75 हजार रुपये परत करून उर्वरित 10 लाख रुपये परत न करता फिर्यादीची फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.