Maval BJP : कारवाई न झाल्यास सहायक निबंधक कार्यालयाला भाजप ठोकणार टाळे

एमपीसी न्यूज – वडगाव मावळचे सहाय्यक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी यांनी अनेक बेकायदेशीर निर्णय घेतले आहेत. त्यांनी घेतलेल्या निर्णयांची उच्चस्तरीय समितीकडून चौकशी व्हावी, तसेच सहाय्यक निबंधक सूर्यवंशी यांच्यावर योग्य कारवाई व्हावी, अशी मागणी मावळ भाजपकडून (Maval BJP) करण्यात आली आहे. येत्या बुधवारपर्यंत भाजपकडून प्रशासनाला वेळ देण्यात आली असून तोपर्यंत योग्य कारवाई न झाल्यास गुरुवारी (दि. 15) सकाळी भाजपकडून सहाय्यक निबंधक कार्यालयावर मोर्चा काढून कार्यालयाला टाळे ठोकले जाणार आहे, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे मावळ तालुका अध्यक्ष रवींद्र भेगडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मावळ भाजपकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेसाठी मावळचे माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, माजी उपसभापती शांताराम कदम, मावळ तालुका भाजपा सरचिटणीस सुनील चव्हाण, शत्रुघ्न धनवे, माऊली अडकर, वसंत म्हसकर आदी उपस्थित होते.

मागील काही दिवसांपासून सहाय्यक निबंधक वडगाव मावळ यांचा अनागोंदी कारभार मावळ तालुक्यात सुरु असून अनेक वेळा तोंडी व लेखी तक्रारी करून देखील त्यांनी त्यांच्या पदाचा गैर वापर करून मागील काही विकास संस्था निवडणुकीवेळी बेकायदेशीर निर्णय घेतले आहेत. याबाबत आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे देखील त्यांची रीतसर तक्रार दाखल केलेली असून अद्याप पर्यंत त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. तक्रार करून देखील कारवाई होत नसल्याने तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हितासाठी भारतीय जनता पार्टी कायमच आक्रमक भूमिका घेऊन सर्व सामान्य नागरिकांना, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम करत आहे. त्यामुळेच विठ्ठल सूर्यवंशी यांचे निलंबन व्हावे व त्यांनी घेतलेल्या बेकायदेशीर निर्णयाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी भारतीय जनता पार्टी मावळ तालुक्याच्या वतीने आपल्या आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मागणी करत आहोत.

विठ्ठल सूर्यवंशी सहाय्यक निबंधक वडगाव मावळ यांचे निलंबन करावे व त्यांची उच्चस्तरीय चौकशी व्हावी याकरिताच भारतीय जनता पार्टी मावळ तालुक्याच्या वतीने 12 सप्टेंबर रोजी टाळाठोक आंदोलन करण्यात येणार असल्याचे आम्ही प्रशासनाला कळवले होते. परंतु, शुक्रवार 9 सप्टेंबर रोजी गणपती विसर्जन व पुढील दोन दिवस शासकीय सुट्टी असल्याने आम्हाला आणखी दोन दिवस मुदतवाढ द्या, आम्ही योग्य तो निर्णय घेऊ असा निरोप वरिष्ठ कार्यालयाकडून आल्याने 12 सप्टेंबर रोजी पुकारण्यात आलेले टाळाठोक आंदोलन दोन दिवसांसाठी मागे घेण्यात आले आहे. परंतु, बुधवार दि 14 सप्टेंबर 2022 रोजी सायंकाळी 5 वा. पर्यंत विठ्ठल सूर्यवंशी सहाय्यक निबंधक वडगाव मावळ यांच्यावर कारवाई न झाल्यास गुरुवार दि 15 सप्टेंबर रोजी सहाय्यक निबंधक वडगाव मावळ या कार्यालयावर लोकशाही मार्गाने हजारोंच्या संख्येने मोर्चा काढून टाळाठोक आंदोलन केले जाणार आहे.

तालुक्यातील विकास संस्थांमधील 14 हजार सभासदांचे (Maval BJP) सभासदत्व रद्द करतांना सभासदांना म्हणणे मांडण्याचा अधिकार दिला नाही. सेवा विकास संस्थांच्या निवडणुकीवेळी 1 हजार रुपये डिपॉजिट भरलेली पावती उमेदवारांना देण्यात आलेली नाही. तालुक्यातील पवना कृषक संस्था ‘ब’ वर्गात असताना लेखी धमकी देऊन ‘क’ वर्गात समाविष्ठ करण्याचा बेकायदेशीर निर्णय घेतला.

राजकीय दबावापोटी व शिफारस पत्रानुसार राष्ट्रवादीच्या 3 कार्यकर्त्यांची प्रशासक म्हणून नेमणूक केली नेमणूक करत असताना संस्था चेअरमन व संचालक मंडळास कोणतीही पूर्वकल्पना न देता राष्ट्रवादीच्या 3 कार्यकर्त्यांची पवना कृषकसंस्थेचे प्रशासक म्हणून नेमणुकीचा बेकायदेशीर आदेश पारित केला.पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत भाजपाच्या ताब्यातील संस्था प्रतिनिधींना निवडणूक लढता येऊ नये म्हणून संस्था ऑडिटरला धमकावून लेखापरीक्षण वर्ग ‘ब’ ऐवजी ‘क’ करण्याचा अधिकार सहाय्यक निबंधक याना नसताना देखील त्यांनी बेकायदेशीर निर्णय घेऊन ब वर्गातील संस्था क वर्गात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला.

कोथुर्णे सोसायटीमध्ये ऐन निवडणुकीच्या वेळी 92 सभासदांना बोगस सभासदत्व देऊन त्यांना मतदानाचा अधिकार दिला. कोथुर्णे सोसायटीमध्ये सभासद असलेल्या 56 सभासदांना पूर्व कल्पना न देता त्यांचे म्हणणे ऐकून न घेता पहिल्याच सुनावणीत सभासदत्व रद्द करण्याचा बेकायदेशीर निर्णय घेतला.

कोथुर्णे सेवा सोसायटी निवडणुकीच्या पूर्वी अंतिम मतदार यादी सादर करत असताना त्यावर सेवा सोसायटी चेअरमन व सचिव या दोघांच्याही सह्या होणे अपेक्षित असताना सोसायटी चेअरमन यांना विश्वासात न घेता केवळ संस्था सचिव यांच्या सहीने मतदार यादी दाखल करून निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली. शिवली विकास सोसायटीच्या विजयी उमेदवारांना अपात्र करण्याचा अधिकार सहाय्यक निबंधक याना नसताना देखील त्यांनी बेकायदेशीर निर्णय घेऊन 5 विजयी उमेदवारांना अपात्र घोषित केले.

विकास सोसायटी निवडणुकीनंतर 30 दिवसांच्या आत चेअरमन व व्हा.चेअरमन यांची निवड होणे अपेक्षित असताना दोन वेळेस चेअरमन व व्हा. चेअरमन निवडीचा कार्यक्रम जाहीर करून निवडीच्या दिवशी संचालकांचे राजीनामे स्वीकारून निवडणूक कार्यक्रम बेकायदेशीर निर्णय घेऊन रद्द केला. शिळिंब विकास सोसायटी निवडणुकीत अंतिम मतदार यादीवर आक्षेप घेतलेला असून देखील मतदारांची नावे कायम ठेऊन भाजपच्या विचारांची 60 नावे बेकायदेशीर निर्णय घेऊन रद्द केली. शिळिंब विकास सोसायटी निवडणुकीतील उमेदवारांच्या बोगस सहया करून उमेदवारी अर्ज बेकायदेशीरपणे मागे घेण्याचा निर्णय घेतला.

BJP : विकासकामांसाठी माधुरी मिसाळ देणार केंद्रीय आदिवासी राज्यमंत्री रेणुका सिंग यांना निवेदन

विठ्ठल सूर्यवंशी हे रायगड जिल्ह्यातील अलिबाग या ठिकाणी कार्यरत असतांना केलेल्या बेकायदेशीर चुकीच्या कामाविरोधात स्थानिक लोकप्रतिनिधी व विविध सेवा सहकारी संस्थांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने विठ्ठल सूर्यवंशी यांची विभागीय चौकशी सुरु असून ती देखील लवकरात लवकर पूर्ण व्हावी. मावळ तालुक्यात जवळपास 111 गृह निर्माण संस्था असून त्यावर प्रशासक नेमून त्यांना लूट केल्याप्रकरणी बेकायदेशीरपणे नियमांपेक्षा जास्त मानधन देऊन गृह निर्माण संस्थांची आर्थिक गृह निर्माण संस्थांनी सहकार आयुक्त, विभागीय सह निबंधक, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे यांच्याकडे तक्रार केलेली असून त्यानुषंगाने विठ्ठल सूर्यवंशी सहाय्यक निबंधक वडगाव मावळ यांची चौकशी झालेली असून देखील अद्याप पर्यंत चौकशीच्या अनुषंगाने काहीही कारवाई झालेली नाही ती देखील त्वरित करावी अशी आपल्या माध्यमातून सहकार आयुक्त पुणे यांना विनंती करतो.

मावळ तालुक्यातील सहाय्यक निबंधक कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांना सहाय्यक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी हे अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करतात व अत्यंत हीन दर्जाची वागणूक देतात याबाबत कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सहकार सचिव व सहकार आयुक्त यांच्याकडे नोव्हेंबर 2021 मध्ये तक्रार दाखल केलेली असून त्यावर देखील अद्याप पर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही ती कारवाई देखील (Maval BJP) त्वरित करावी अशी मागणी आम्ही सहकार मंत्री यांच्याकडे करणार आहोत.

विठ्ठल सूर्यवंशी हे सहकार विभागाच्या संघटनेचे अध्यक्ष असल्याचे भासवून तालुक्यातील सहकारी संस्था नागरिक व कार्यालयातील कर्मचाऱ्यांना दमदाटी करत असल्याच्या तक्रारी देखील आमच्याकडे आल्या असून वास्तविकतः सहकार विभागाच्या संघटनेचा कार्यकाळ देखील सूर्यवंशी यांनी पूर्ण केलेला असून सध्या ते त्या पदावर कार्यरत नसून देखील बेकायदेशीर पत्रव्यवहार करत असल्याचे निदर्शनास येत असून मि सहकार विभागाचे जे कोणी पदाधिकारी असतील त्यांना विनंती करतो कि विठ्ठल सूर्यवंशी यांना (Maval BJP) संघटनेतून बरखास्त करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.