Pimpri : छत्रपती शिवाजी महाराज समाजप्रबोधन पर्वाचे आयोजन

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने डांगे चौक थेरगाव, येथे छत्रपती शिवाजी महाराज समाजप्रबोधन पर्वानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे माहिती महापौर राहुल जाधव यांनी दिली.

डांगे चौक थेरगाव येथे दि. १७ फेब्रुवारीला तात्या मोरे यांचे ‘शिवचरित्रगाथा’ या विषयावर सायंकाळी सात वाजता व्याख्यान होणार आहे. दि. 18 फेब्रुवारीला प्रशांत देशमुख यांचे सायंकाळी सात वाजता ‘छत्रपती संभाजी राजे जाज्वल्य व प्रेरणादायी कार्य’ या विषयावर यांच्या जीवनावर आधारीत व्याख्यान होणार आहे.

तर दि.१९ फेब्रुवारीलाा अरुण घोडके यांचे सायंकाळी सात वाजता ‘छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रेरणादायी कार्य’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.