Chichwad : डॉ. श्रीराम लागू यांच्या श्रद्धांजली सभेचे शनिवारी चिंचवडमध्ये आयोजन

एमपीसी न्यूज – अंशुल क्रिएशन आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने दिवंगत ज्येष्ठ अभिनेते व सामाजिक कार्यकर्ते डॉ. श्रीराम लागू यांच्या निधनानिमित्त श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या शनिवारी (दि. 21) सायंकाळी पाच वाजता चिंचवड येथील प्रतिभा महाविद्यालयाच्या प्रेक्षागृहात ही सभा होणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील विविध सामाजिक व सांस्कृतिक संघटनांचे प्रतिनिधी या सभेमध्ये सहभागी होणार आहेत. त्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. दीपक शहा, समितीचे राष्ट्रीय समन्वयक व सहकार्यवाह डॉ. राजेंद्र कांकरिया, ॲड. मनिषा महाजन, राष्ट्र सेवा दलाचे प्रा. सुभाष वारे, पिंपरी-चिंचवड नागरी हक्क कृती समितीचे मानव कांबळे, नाट्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेचे भाऊसाहेब भोईर, सुहास जोशी, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लांडगे, संभाजी ब्रिगेडचे संपर्कप्रमुख नकुल भोईर, लेखक श्रीकांत चौगुले, पिंपरी-चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले, मराठी भाषा संवर्धन समितीचे सदस्य संभाजी बारणे, संविधान जनजागरण अभियानाचे विष्णू मांजरे, जगद्‌गुरू प्रतिष्ठानचे ॲड. लक्ष्मण रानवडे, सहारा सोशल फौंडेशनचे प्रा. गोरख ब्राम्हणे, संत रविदास विचार मंचचे लक्ष्मण मुदळे आदि सहभागी होत आहेत. डॉ. लागू यांच्या घरी काम करणाऱ्या व दीर्घकाळ त्यांच्या सहवासात राहिलेल्या सुनंदा चव्हाण या त्यांच्या आठवणी विशद करणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.