Pune : केरळमध्ये घरे बांधून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा – प्रकाश आंबेडकर 

एमपीसी न्यूज – केरळमधील नैसर्गिक आपत्तीमध्ये हजारो कोटींचे नुकसान झाले असून नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यात प्रामुख्याने १७ लाख घरांचे नुकसान झाल्याने हजारो लोक बेघर झाले आहेत. त्यामुळे केरळातील
जनतेला आधार देण्यासाठी तेथे घरे उभारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत केली आहे. 

तर ही घरे बांधण्यासाठी राज्यातील अनेक व्यापारी बांधकामाचे साहित्य आणि आर्थिक मदत देण्यासाठी तयार आहेत. त्यामुळे राज्य सरकारने यावर जीएसटी आकारू नये, अशी सूचनाही यावेळी आंबेडकर यांनी केली. यावेळी आरोग्य सेनेचे अभिजीत वैद्य देखील उपस्थित होते.

दरम्यान, केरळमध्ये वैद्यकीय मदत देण्यासाठी आरोग्य सेनेचे दहा सदस्यांचे वैद्यकीय मदत पथक 30 ऑगस्ट रोजी रवाना होणार आहे. या पथकाचे नेतृत्व आरोग्य सेनेचे संस्थापक डॉक्टर अभिजित वैद्य करणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.